पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५८ बृहद्योगवासिष्ठसार. दिकांनी भराभर जीव दिले. राजानेही अग्निप्रवेश केला." पण विश्वास लोकांच्या तोंडची ही वार्ता ऐकून मला मोठा पश्चाचाप झाला व तेथून निघून मी प्रयागास गेलो. स्वतःच्या शुद्धीकरिता प्रायश्चित्त केले. तीन चादायणे करून भाज पारणे झाल्यावर येथे मालों. त्यामुळे मी असा कृश व श्रांत दिसत भाहे." श्रीवसिष्ठ-तें ऐकून गाधीला मोठे भाचर्य वाटलें व त्याविषयीच त्याने त्या अतिथीला पुनः पुनः अनेक प्रश्न विचारून भापल्या मनाचा निश्चय करून घेतला. नंतर त्या दोघांनीही ती रात्र तेथे घालविली. दुसऱ्या दिवशी जगदीप सूर्य उदय पावला असतां प्रातः कृत्ये संपन्न व गाधीची अनुज्ञा घेऊन अतिथि गेला आणि संध्यावंदनादि नियत कर्माचे अनुष्ठान करून झाल्यावर गाधि एकटाच आपल्या रम्य कुटीत बसून विस्मित चित्ताने असा विचार करू लागला.- मी भ्रमावस्थेत जे पाहिले होते तेच या ब्राह्मणाने खरे पाहिले व मला सागितलें. तेव्हां हे काय बरे असावें ! ही निव्वळ माया दिसते. मी आप्तामध्ये मेलो आहे, असे जे पाहिले ते खोटें माहे, यांत मुळीच संदेह नाही. पण या पुढच्या वृत्ताताविषयी मन थोडेसें साशंक होत आहे. यास्तव मी आता त्या भूतमंडळांतील गावाबाहेरील म्हारवाव्यांत जाऊन खरा प्रकार काय आहे, तो पहातो. रामा, असा निश्चय करून तो उठला. उद्योगी प्राज्ञांना मनोराज्यही सुलभ असते. गाधीने स्वप्नात जसे पाहिले होते तसेच तेथे जाऊन पुनः अवलोकन केलें. निश्चयाने दुष्प्राप्यही सहज मिळते, असे ठरविण्यास हेच एक निदर्शन पुरे आहे. असो; गाधि आपल्या कुटीतून निघून जगन्माया प्रत्यक्ष पहात स्वरेनें अनेक देशास ओलाडून चालला. काही दिवसांनी, एकटेंच उंटाचे पोर करज नावाच्या काटन्या झाडापाशी जसे जाउन पोचते त्याप्रमाणे तो भूतमंडलास पोचला. त्यांत स्मरणकाली मनांत उभ्या रहाणान्या आकाराच्या एका गावास त्याने पाहिले. त्याच्या बाहेर तो म्हारवाडा होता. पाताळांतील नरकाप्रमाणेच तो त्याला भासला. तेथें स्वांत पाहिलेल्या सवे खुणा त्याला दिसल्या. तोच हा चांडाळवाडा. येथेच मी या घरात श्वपच झालो होतो. या या स्थळी अशी अशी दुष्कृत्ये केली इत्यादि सर्व त्याला आठवलें व सर्व पदार्थाची भोळखही पटली. पण त्या बीभत्स