पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १७. ७५७ माझा विवाह झालेला नसून, ब्राह्मण दुष्ट मदिरेचे स्वरूप जसें पहात नाही त्याप्रमाणे मी स्त्रीचे मुखही पाहिलेले नाही. माझ्या देशांतील माझे बांधव येथून फार दूर आहेत. मग ज्यांच्यामध्ये मी मरून पडलों माहे असे पाहिले ते कोण ? मला वाटते की, हा सारा भ्रम आहे. हे स्वप्न आहे. हे दुष्ट चित्त, वनातील मत्त सिंहाप्रमाणे, असेंच नेहमीं भटकत असते. यास्तष त्याविषयीं आतां अधिक विचार करीत बसण्यात काही अर्थ नाही. राघवा, याप्रमाणे मनाची सगजूत घालून तो ब्राह्मण एकटाच आणखी काही दिवस त्या आश्रमात राहिला. नतर एकदा ब्रह्मदेवाकडे जसा दुर्वास मुनि येतो त्याप्रमाणे त्याच्याकडे एक प्रिय अतिथि आला. तेव्हां गाधीने त्याचे उचित आतिथ्य केलें. बसावयास दर्भासन दिले. हातपाय धुवून चूळ भरावयास स्वच्छ व शीतळ अर्घ्य दिले आणि पुष्पे व फळे समर्पण केली. तेव्हा त्या सर्वाचा स्वीकार करून तोअतिथि मार्गातील श्रम घालविण्याकरिता तेथें सुखाने राहिला. काही वेळाने भगवान् सूर्य अस्ताचलावर जाऊन पोचला असता ते दोघेही सध्यावदन करावयास उठले. त्यानी सरोवराच्या काठी बसून जपादि सर्व सांग सायविधि आटोपला व शेवटी अमृतप्राय जलपान करून पर्णकुटीत परत आल्यावर पल्लवशय्येवर शयन केले. पण झोप न भाल्यामुळे पडल्या पडल्या त्याच्या अशा शात गोष्टी सुरू झाल्या. गाधीने त्या अतिथीस म्हटले " ब्रह्मन , तू असा कृश व अतिशय श्रांत कां झाला आहेस?" तेव्हा अतिषि बोलला भगवन् , माझ्या कृशतेचे व श्रमाचे खरे कारण ऐक. आम्ही कधी असत्य बोलत नसतो. या भूलोकी उत्तरदिशेत कीर या नावाचा एक मोठा श्रीमान् देश आहे. तेथे लोकाच्या पूजेचा स्वीकार करीत मी एक महिनाभर रहात होतो. चित्तवेताळाच्या योगानें मोहित झाल्यामुळे मी तेथें नानाप्रकारच्या लोभात पडलो होतो. तेथे असतांना एकदा एकाने सहज बोलताना मला म्हटले, " ब्राह्मणा, येथे भाठ वर्षे चाडाळ राजा होता. " तें ऐकून मला मोठे आश्चर्य वाटले व मी तीच गोष्ट गावांतील दुसन्याही सजनाना विचारली. त्यानीही तसेंच सांगितलें. ते ह्मणाले, " काय सांगावें, ब्राह्मणा! येथे खरोखरच एक चांडाळ आठ वर्षे राज्य करीत होता. शेवटी तो अंत्यज आहे, असे जेव्हां सर्वांना कळले तेव्हां गांवभर हाहाकार झाला. शेकडों पवित्र ब्रामणा-