पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५६ बृहद्योगवासिष्ठसार. लोकात निंद्य ठरलेल्या दुष्ट प्राण्याच्या जीवितापेक्षा मरण शतपट चांगले असते. __ असा निश्चय करून गवलाने त्याच पेटलेल्या अनीत उडी टाकली त्याचे अंग भाजून असह्य वेदना होऊ लागली असता इकडे जळांत अघमर्षण करीत असलेला गाधि ब्राह्मण, स्वप्नांत जसा एकादा दचकून जागा होतो त्याप्रमाणे, झटकन देहभानावर आला. श्रीवाल्मीकि-मुनि वसिष्ठ इतकें सागत आहेत तो दिवस मावळला आणि सर्व सभासद आपापल्या स्थानी जाऊन व पूर्वोक्त क्रमांन सर्व क्रिया व रात्र संपवून प्रातःकाली उचित समयी नेहमीप्रमाणे राजसमेंत आले ४६. येथे बारावा दिवस संपला. सर्ग ४७-गाधीन मतिर्थापासून कीरराजाचं चरित्र ऐकले व स्वत सेथे जाउन, पाहून व लोकाना विचारून तो विस्मित झाला. श्रीवसिष्ट-राघवा, याप्रमाणे गाधि चार घटिकानी मानसिक संसार- भ्रमापासून मुक्त झाला. त्याचे मन पुन. शात झाले. कल्पातसमयीं ब्रह्मदेव जसा जगद्रचना सोडतो त्याप्रमाणे तो ब्राह्मण मानसिक संमोहास सोडून शात झाला. मद्याचा मद उतरला ममता जशी एकाद्याची बुद्धि शात होते अथवा निद्रित पुरुप चांगला जागा झाला असता जसा विचार करण्यास समर्थ होतो त्याप्रमाणे गाधि हळु हळु शात झाला व त्याला विचार सुचला. रात्र मपली म्हणजे उद्योगी पुरुप जसा 'आज मला अमुक अमुक करावयाचे आहे' असा सकेत करतो त्याप्रमाणे गाधिही भी अमुक असून माझें है कर्तव्य व हे अकर्तव्य आहे' असे मनात ठरवू लागला. भापल्या स्वरूपाचे चागले भान होताच तो सगेवरातन वर आला. तेथढे ते सर्व पदार्थ दुमरेच आहेत, असे वाटल्यामुळे तो अतिशय विस्मित झाला व 'मी कोण : हे काय पहात आहे, व मी काय केले?' असे म्हणून तो एकच भुवयी चढवून विचार करू लागला. पण एका क्षणातच 'मला भ्रम झाला होता' हे त्याच्या लक्षात आले. नतर त्या सरोवराच्या काठी बसून तो पुनः असें चिंतन करू लागला. ती माता कोठे व ती प्रिया कोठे आहे? आणि मी माता व प्रिया यांच्यामध्ये मरून पर असे पाहिले तें काय ! माझे भाई-बाप लहानपणीच इह लोक सोडून गळ.