पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ४१. ७११ तेथील सर्व माणसे खिन्न झाली आहेत, असे त्याला आढळले. त्याचेही तोंड उतरलें. इतक्यांत ती कष्टकर वार्ता सर्व नगरभर पसरली. सर्वांना अतिशय पश्चात्ताप झाला. राजाला बाहेर तोंड काढण्याची लाज वाट लागली. घरांत असलेल्याही त्याला शवाप्रमाणे कोणी शिवेनासे झाले. भृत्यजन त्याच्या वाऱ्यालाही उभे रहातनासे झाले. त्याला कोणी मान देईना. वाळूमध्ये टाकलेल्या जलबिंदूप्रमाणे त्याची आज्ञा कार्यक्षम झाली नाही. राक्षसापासून जसे सर्व भिऊन दूर जातात त्याप्रमाणे मंत्री व सैनिकही त्याच्यापासून दूर गेले. त्यामुळे तो दुर्दैवी राजा तेथे एकटाच राहिला. तो लोकाना पुष्कळ हाका मारीत होता; पण त्याला कोणी भोच देईना. तिकडे 'या चाडाळाने आझांला भ्रष्ट करून सोडलें आहे. याला प्रायश्चित तर काही दिसत नाही. यास्तव आता आपण सर्वांनी मिळून अग्निप्रवेश करूं या' असा निर्णय करून नगरातील लोक व मंत्री यांनी शुष्क काष्ठांनी सर्वतः अग्नि पेटविला व सोनी त्यांत भराभर उड्या टाकल्या. सर्व नगरभर आक्रोश सुरू झाला. जिकडे तिकडे 'हाय हाय' या धनीवाचून दुसरे काही ऐकू येईनासे झालें. अगोदर अनीत पडलेल्या लोकाकरितां मागे राहिलेले त्याचे आप्त करुणेनें विलाप करीत होते. जळणाऱ्या लोकांच्या अंगाचा दुर्गध सर्व राजधानीत पसरला. मुख्य मुख्य लोकांनी याप्रमाणे स्वदेहांस अग्नीत टाकून जाळून घेतले असता तेथे चांगला रक्षक कोणीच न राहिल्यामुळे चौर, लुटारू व क्रूर लोकांनी स्त्रिया, अर्भकें व दीन वृद्ध याना यथेच्छ छळलें व अनेक अत्याचार केले. सारांश त्या नगरांत कल्पांत उडाला. पण रामभद्रा, भापल्या दुर्नीतीमुळे या सर्व लोकांवर हा भयंकर प्रसंग माला आहे, हे जाणून राज्य करीत असताना झालेल्या सज्जनांच्या संप- र्कामुळे ज्याच्या मनावर चांगले संस्कार झाले आहेत असा राजा गवल शोकाने व्याकुळ होऊन असा विचार करू लागला.- ___ मजकरिता हे सर्व लोक या अशा विपत्तींत परले आहेत. या राज्या- तील सर्व श्रेष्ठ पुरुषांच्या नाशाचे कारण मी आहे. माझ्या भयंकर दोषांमुळे या सर्वांनी आत्महत्या केल्या. तेव्हा आता मला तरी जिवंत राहून काय करावयाचे आहे ! यापुढील माझे जीवित म्हणजे साक्षात् दुःखच होय. यावेळी मरण हाच मला महोत्सव वाटत माहे. कारण