पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५४ बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग४६-हा चांडाळ आहे, असें ऐकून सर्व जनांनी भनीत प्रवेश केला. त्याच्या दु खाने दुखी होऊन त्यानेही अमिप्रवेश केला. तो इतक्यात इकडे गाषि- ब्राह्मण देहभानावर आला. श्रीवसिष्ठ-रघुनंदना, याप्रमाणे तो चांडाल दैववशात् विलासिनीकडून परिवेष्टित, मंत्रिमंडलानें पूजित, सर्व सामतांकडून वंदित व छत्रचामरयुक्त झाला. तो सुंदर दिसू लागला. हळु हळु त्याला सर्व राज्यगुण व कार्ये कळू लागली. त्याचा शोक, भय व आयास नाहीसा झाला. 'सर्व गुण कांचनाचा आश्रय करितात' या न्यायाने तो ज्ञानी आहे, गुणी आहे असें म्हणून सर्व त्याची प्रशंसा करूं लागले. त्याला आपल्या जातीचे व पूर्व स्वभावाचे विस्मरण झाले. याप्रमाणे पूर्ण भानंदवृत्तीने युक्त व नानाप्रकारच्या आसवानी प्रत्यही मत्त होणाऱ्या त्यानें कीरदेशांत भाठ वर्षे राज्य केले. तो तेथे मोठा सदाचारसंपन्न होऊन राहिला होता. ___ एकदा यदृच्छेने सर्व भूषणे काढून ज्यामध्ये तारा, चंद्र, सूर्य, व मेघही नाहीत, अशा सर्वतः नीलवर्ण आकाशाप्रमाणे तो झाला. कारण प्रभुतेने पुष्ट झालेले चित्त कृत्रिम भूपणादिकाचे भनिनदन करीत नाही. नंतर तो तशा अवस्थेत एकटाच बाह्य अगण्यात निघून आला. तो तेथें त्याला गात असलेल्या काळ्या भोर अगाच्या चाडाळाचा सघ दिसला. तो तुणतुणे वाजवून त्यावर मृदुस्वराने लावण्या म्हणत होता. त्यांतील एक चंडाळाचा वृद्ध नायक राजाला पाहून वर उठला. त्याचे मग कोळशा. सारखे काळे व नेत्र गुंजेसारखे लाल होते. तो एकाएकी कीरराजाला म्हणाला " अरे केटजा, येथला राजा तुला किंवा दुसन्या कोणा सुदर लावण्या म्हणणाराला कधी तरी वस्त्रालकारादि देतो का ! फार दिवसांनी तुला आज पाहून मला मोठा आनद झाला आहे. कारण बंधुदर्शन सर्व आनंदाचे व मोठ्या लाभाचे निधान आहे." तो चाडाळ असे बोलत माहे तोच राजाने त्याचा तिरस्कार केला व त्याची व आपली जणु काय भोळखच नाही, असे दाखविले. पण राजवाड्याच्या माडीवरून खिडकीतून ते पहात असलेल्या राजपत्नीना व अमात्यांना तो चांडाळ आहे, हे त्यावरून कळले व ती सर्वजणे म्लान झाली. राजा तर त्या वृद्धचांडाळाचा धिक्कार करून अंतःपुरांत गेला. पण १ हे त्याचे चांडळवाव्यांतील प्रख्यात नाव होते. -