पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १५. ७५३ चाटली नाही. सर्व लोक मोठ्या आश्चर्याने व भीतीने जो पहात माहेत तों त्या पशूनें त्या भाग्यवानाला भापल्या मस्तकावर बसविलें. त्याबरोबर मंगलवाद्यांचा पनि व आनंदी जनांचा जयजयकार दश- दिशांस व्यापूं लागला. बंदिजन त्या नव्या राजाची स्तुति करूं लागले. त्याला भूपित करण्याकरितां श्रेष्ठ त्रिया त्यान्यापाशी आल्या. त्या मुंदरींनी त्याला हत्तीवरून उतरविलें व राजमदिराच्या अतर्गृहोत नेले. त्या रमणींनी आप- ल्या कोमल तळहातानी त्याच्या राठ शरीरास सुवासिक द्रव्ये लाविली. जन्मापासून न घासलेल्या व त्यामुळेच बुरशी चढलेल्या दातास सुवासिक चूर्ण लावून शुभ्र केलें. पाढन्या केसांस अत्तरें व दुसरी तेले लाविली. उष्णोदकाने स्नान घातले, मऊ वस्त्रे नेसावयास दिली. रत्नें व भूषणे योग्य स्थानी घातली. कपाळी कस्तुरीचा टिळा लाविला. सुप्रास तांबू- लादि दिल्यावर तयार केलेल्या पर्यकावर पडून थोडी विश्राति घ्यावयाम सागितले व त्यानतर मुदर वने व वेष देऊन त्याला राजसभेत आणले. राघवा, वस्त्रे व भूषणे याच्या योगाने शरीराला शतगुण शोभा येत अमने व बाह्य दृष्टी पामराचे चित्त आकर्षण करून घ्यावयाचे झाल्यास अमगल शरीरालाही बाह्य व जड भूषणादिकानींच रम्य बनवावे लागते. जो वृद्ध, भिकारी व दुःखी चाडाळ एका प्रहारापूर्वी अतिशय कुरूप दिसत होता तोच ता मुदर दिस लागला. सभासद मोठ्या कौतुकानें न्यान्याकडे पाहू लागले व सर्वांनी मोठ्या आनंदाने त्याला आपला राजा केलें. देव जसे इद्राच्या आज्ञेत रहातात त्याप्रमाणे सर्व प्रजा त्याच्या आज्ञेत रहाण्यास सज्ज झाली. सर्व नगरभर आनंद पसरला व सामंत राजे त्यास सर्वथा अनुकूल झाले. - साराश हे राघवा, कावळ्याला जसें अरण्यात मरून पडलेले पुष्ट हरिण सांपडावें त्याप्रमाणे त्या गाधिचाडाळाला कीरपुरातील राज्य मिळाले. तो तेथे गवल या नावाने प्रसिद्ध झाला. सुंदर स्त्रिया त्याची सेवा करूं लागल्या. जन्मभर धुळीत लोळणाऱ्या त्याच्या अंगाला स्त्रिया कोमल तळ- हातांनी कस्तुरी-केशर-मिन चंदनाची उटी लावू लागल्या व त्यामुळे मक- स्मात् राज्यलक्ष्मीवान झालेल्या त्याचे शरीर, थोड्याच दिवसांत, दृष्ट, पुष्ट बमन निश्चित काले १५.