पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ बृहद्योगवासिष्ठसार. व ज्ञानमार्ग सतत चालू झाले. हे दोन्ही मार्ग या सृष्टीत असेच चालू रहाणार. अज्ञान व मन याच्या योगाने हा संसाररोग वाढला आहे. त्यास नाहींसें करावयाचे झाल्यास निष्काम कर्मयोग व ज्ञानयोग या उपायाचाच क्रमाने आश्रय केला पाहिजे. असो, त्या मुनीनी कर्मविभागार्थ व शास्त्रीय मर्यादेच्या पालनार्थ भिन्न भिन्न स्थळी राजे स्थापिले. त्याच्या करिता अनेक नीतिशास्त्रे निर्माण केली. स्मृत्या, पुराणे, यज्ञशास्त्रे इत्यादि धर्मादि पुरुषार्थांचे उपाय सुचविणारे ग्रथ रचिले; व येणेप्रमाणे या लोकप्रवाहास सुव्यवस्थित केले. पण पुढे हे कालचक्र असेच चालले असता अनुष्ठानाचा क्रम शिथिल झाला लोक विषयासक्त झाले. सग्रह करण्याकडे त्याच्या चित्ताची प्रवृत्ति होऊ लागली. त्याबरोबर शीत- उष्ण, लाभ-अलाभ, इत्यादि द्वद्वे त्याच्या बोकाडी येऊन बसली; प्रजाजन अनेक अपराध करून दड भोगू लागले जिकडे तिकडे क्लेशच क्लेश माजला. राजास युद्धावाचून राज्य चालविणे अशक्य झाले. पण पुढे पुढे ते युद्धासही असमर्थ झाले व सर्व प्रजाजनासह दीन होऊन राहिले. हा सर्व अविवेकाचा विलास पाहून आमच्या चित्तात दया उद्भवली व आझी त्या राजास ज्ञानदृष्टीचा लाभ करून दिला ही अध्यात्मविद्या प्रथम राजास प्राप्त झाली. ह्मणून हिला राजविद्या व राजगुह्य असे ह्मणतात. या श्रेष्ट विद्येच्या योगाने राजे मुखी झाले साराश, बा रामा, याप्रमाणे अनेक राजे होऊन गेले असता आता तू या दशरथापासून उत्पन्न झाला आहेस. तुझ्या प्रसन्न चित्तात हे पवित्र व निनिमित्त वैराग्य उत्पन्न झाले आहे. अनेक विवेकी पुरुषातील एकाद्या भाग्यवानासच वैराग्याचा लाभ होत असतो व तोही अनेक दुःखे भोगल्यावाचून होत नाही. ह्मणून त्यास राजस वैराग्य ह्मणतात. पण तुझें हें वैराग्य अशा प्रकारचे नाही. काहीएक कारण नसतांना केवळ आपल्याच स्वाभाविक विवेकामुळे उत्पन्न झालेले हे तुझें सात्त्विक वैराग्य आहे. या तुझ्या अपूर्व वैराग्याचे आमांस मोठे कौतुक वाटते. तुझ्यासारिख्या सज्जनास या घाणेरड्या विषयांकडे पाहून केवळ विवेका- मुळेच उत्तम वैराग्य होते. ज्या महात्म्यांस असे निष्कारण वैराग्य होते त्याचेच मन अति निर्मल असते. आपल्यापाशीच विचार करून या संसाररचनेचा निर्णय करणे, हे उत्तम पुरुपावाचून इतरास साध्य नाही.