पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५१ बृहद्योगवासिष्ठसार. कलेत फार निष्णात झाला. त्याच्या त्या गुणावर लुब्ध होऊन एका त्याच्या सारख्याच काळ्याकुट्ट चांडाळाने आपली तरुण व काळी कन्या त्याला विवाहविधीने दिली. त्या समानवर्ण वधूवरांचा जोग चांगला शोभत होता. भगवान् मदनाने त्यांच्या अस्पृश्य जातीकडे न पहातां, त्यांच्याही शरीरांत यथेच्छ संचार करून त्या जोडप्याला प्राम्यधर्मात नियुक्त केले. तेव्हा त्याचे साक्षात् फळच, अशी त्यांना वारंवार अपत्ये होऊ लागली. त्याचे पोषण व त्यांच्यापासून होणारा सुखाभास यात ती दोघे निमग्न झाली. काही काळानें, ती काव्यांसारखी असलेली पोरें मोठी झाली व गाधि-चंडाळाला जरेने ग्रासले. तो तपस्ल्या- प्रमाणे आपल्या झोपड्यातच राहून आयुष्य घालवू लागला. त्याच्या तरुण- पुत्रांची चारही त्याच्यासारखींच उच्चार न करण्यासारखी होती. ते सर्व बापाप्रमाणेच अरण्यातील पशूना मारण्यात पटाईत झाले होते. पण काळाने त्याच्या सर्व परिवाराला अकस्मात् गट्ट केले. त्या गाधि चाडाळाची प्रियभार्या व तिची करती-सवरती अपत्ये एकाएकी एका भयंकर रोगाने मेली. तेव्हा त्या म्हातान्याच्या दु.खाला पार नाहीसा झाला. क्रमाने त्या सर्वांना अग्नि देऊन तो रडत रानोमाळ फिरूं लागला. काही दिवसानी आपला देश सोडून तो वाट फुटेल तिकडे जाऊ लागला. पुष्कळ भटक. ल्यावर त्याला कीराचा देश लागला. त्यातील राजधानीस यहछेने पोच- त्यावर तेथे मोठा उत्सव चालला आहे, असे त्याला आढळले. तो काय चमत्कार आहे, ते पहावे म्हणून गावि पुढे गेला. तो त्याला एक मोठा शृंगारलेला हत्ती समोर येत असून त्याच्या आजुबाजुम हजारों स्त्रीपुरुषाचा घोळका जमला आहे, असे दिसले. तेथील राजा मेल्यामुळे व त्याला अपत्य नसल्यामुळे दुसरा राजा कोण करावा हे ठरविण्याकरितो न्याला स्वैर सोडले होते. त्याच्या मागोमाग अनेक भूषित सुदर स्त्रिया, सामत राजे व राजपुरुष होते. या वृद्ध दुःखी चाडाळाने कौतुकाने व निश्चल दृष्टीने त्या हत्तीकडे पुष्कळ वेळ पाहिलें. हत्तीनेही त्याच्याकडे पाहिले आणि एकाएकी जवळ जाऊन त्याला सोंडेने वर उचलले. दुसरा कोणी नागरिक तर तेव्हांच भिऊन मेला असता; पण हा चांडाळ पशूशी सटा- पटी करण्यांत चांगला कुशल असल्यामुळे त्याला त्याची मुळीच भीति