पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १५. भसा बराच वेळ रडण्याचा प्रकार भाटोपल्यावर बांधवांनी त्याच्या शरीरास श्मशानांत नेले. तेथे. भनेक शबें जळत असून ती 'पहा, तुमचा सुद्धा असाच शेवट होणार! सावध व्हा.' असेंच जणुं काय उंच वालांनी सर्वांस सुचवीत होती. रामा, श्मशानांतील बीमत्स प्रकाराचे वर्णन करण्यांत फारसे तात्पर्य नाही. तेथे गेल्यावर काष्ठादिकाची रचना करून त्याच्या आप्तांनी त्याला अग्नि दिला असतां भगवान् पावक त्याच्या मांस-मेदयुक्त शरीरास जाळू लागला. थोड्याच अवकाशात अग्नीने त्याचे भस्म केलें व हळु हळु आपणही शात झाला. नंतर सर्व शरीर जळून गेले आहे, असे पाहून त्याचे आप्त स्नान करून व जलांजलि देऊन घरी परत आले. सारांश राघवा, त्या तपस्वी ब्राह्मणाने सरोवरांत अघमर्पण करीत असतांना हा सर्व चमत्कार पाहिला ४४. सर्ग ४५-गाधीचा चांडाळीच्या उदरात जन्म. किराताची स्थिति व राज्यप्राप्ति, श्रीवसिष्ठ-त्यानतर जलामध्ये एकाग्र मनाने अघमर्षण करीत अस लेल्या गाधीने आपला पुढचा जन्म पाहिला. भूतमंडल-देशाच्या सीमें, वरील एका गावाच्या बाहेरील म्हारवाड्यात एका चाडाळस्त्रीच्या उदरांता आपण गेलो आहों; तेथील साक्षात् नरकवास भोगीत आहों, योग्य ममयी आपले सुकुमार शरीर तिन्या योनिछिद्रातून मोठ्या कष्टाने बाहेर पडले आहे, तेथें दुग्धादि प्राशन करीत आपण हळु हळु मोठे होत आहों; चांडाळी मळकट माडीवर आपल्याला घेऊन फार आनदित होत आहे; आपल्या घाणेरड्या तोंडाने मुके घेत आहे; जणुं काय साक्षात् यमदूतच असा आपला चाडाळ बापही मोठ्या लडिवाळपणाने आप- त्याला उचलून सुयाप्रमाणे टोचणान्या तोंडावरील केसानी आपल्या सुकु- मार तोडास बोचीत चुबन घेत आहे; आपण उत्तरोत्तर मोठे होउन, लंगोटी लावून, उघड्या भंगाने म्हारवडाभर फिरण्याची व बरोबरीच्या पोराना अश्लील शिव्या देत ग्राम्य भाषा बोलण्याची शक्ति आल्यामुळे भाडखोरपणाचा अभ्यासच करीत आहों, असें त्याने पाहिले. त्या चांडाळ- पुत्राला बारावें वर्ष लागले. तेव्हा तो हातांत तीक्ष्ण शस्त्रे व बरोन कुत्र्यांचा परिवार घेऊन घोर भरण्यात जाऊ लागला. एकादा ब्राह्मणपुत्र जसा दिवसभर गुरूपाशी बसून मध्ययन करतो त्याप्रमाणे तो भरण्यांत शिरून दिवसभर हिंसेचा पाठ क बागला. थोड्याच वर्षात तो त्या