पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १४, फळ मिळणार ! 4 तो नसल्यास कितीही, जरी पूजन केले तरी काय होणार : विचार व उपशम यांवाचून हरीची प्राप्ति होणे शक्य नाही व त्यांच्या योगाने मुक्त झालेल्या पुरुषाला ज्याच्या हातांत कमळ आहे अशा हरीच्या देहापासून कोणता अधिक लाभ होणार आहे ! रामा, तूं आपल्या चित्तालाच विचार व उपशम यांनी युक्त कर. तें सिद्ध झाले की तूं सिद्ध झालास. माधवादिकांची जशी मोठ्या भक्तीने आराधना करतोस तशीच स्वात्म्याची करण्यास कोणती आड काठी आहे ? प्राणिमात्राच्या हृदयात विष्णु स्थित आहे. पण त्याला सोडून जे बाहेरच्या विष्णूची आराधना करतात त्यास काय म्हणावें ! हृदय-गुहेंत रहाणारे चित-तत्त्व हे त्याचे मुख्य सनातन शरीर आहे व चक्र- गदा-युक्त हा त्याचा गौण आकार आहे. मुख्य सोडून गौणाच्या मागे लागणे अगदी प्रशस्त नव्हे. तयार असलेले रसायन सोडून दुसरे तयार करावयास लागणे यासारखी बालिशता आणखी कोणती असणार ? नित्य अभ्यास व विवेक याच्या योगाने चित्त अवश्य प्रसन्न होते. विष्णूचा वर मिळणे हे सुद्धा प्राण्याच्या अभ्यामवृक्षाचेच फळ आहे. सर्व उत्तम दशाची स्वमनोनिग्रह हीच उत्तम भूमि आहे. सगरपुत्रानी पृथ्वीला खणलें व देवासुरानी मदराचलास रखीसारखे ओढले; पण ते सुद्धा मना- निग्रहाचेच फळ आहे. मनोरूपी महामत्त सागर शात होई तो प्राणी सहस्रावधि योनीत जन्म घेत भ्रमण करितात. ब्रह्मा, विष्णु, इद्र, रुद्र इत्यादिकांची दीर्घ काल आराधना केली व ते प्रसन्न झाले तरी मनोव्याधी- पासून सोडवू शकत नाहीत. यास्तव राजपुत्रा, जन्मक्षयाकरिता केवल संवित्-चें चिंतन कर ४३. सर्ग ४४-गार्धाचे आख्यान. दृश्याचे मिथ्या दुःखस्वरूप. श्रीवसिष्ठ-रामा, ही अनंत संसारमाया आत्मचित्तजयानेच क्षीण होते. तिचे वैचित्र्य तुझ्या ध्यानात यावे म्हणून हा इतिहास सांगतो तो ऐक.- ___ या पृथ्वीच्या पाठीवर कोशल म्हणून एक देश आहे. त्यात गाधि या नावाचा एक गुणी ब्राह्मण होता. तो महा श्रोत्रिय (वेदाध्यायी ) बुद्धिमान् ष साक्षात् धर्ममूर्तिच होता. बालपणापासूनच तो फार विरक्त असे. एकदा तो काही तरी निमित्त सांगून भातवर्गाला सोडून निघाला व एका भपं.