पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १३. नसते त्याची त्याविषयांची इच्छा सर्वथैव नष्ट होते, व अशा पुरुषाची जी स्थिति तीच जीवन्मुक्तता होय. पुढे प्रारब्ध संपल्यामुळे देहक्षय झाला असतां तीच पुनर्जन्मरहित विदेह मुक्ति होते. ती कोणाला प्रत्यक्ष दिसत नाही. जीवन्मुक्ताच्या हृदयामध्ये भाजलेल्या बीजासारखी पुनर्जन्मांकुर- रहित शुद्ध वासना रहाते. पवित्र, अतिउदार, शुद्ध सत्त्वमय व आत्मध्यान. मय, अशी ती वासना त्याच्या ठायीं निजलेल्या पुरुषाप्रमाणे रहाते व तिच्या योगाने त्याचा व्यवहार यदृच्छेने होतो. राघवा, हृदयातील त्या शुद्ध वासनेमुळे प्रारब्ध अवशिष्ट असन्यास समाधिस्थ जीवन्मुक्त हजार वर्षांनीही उठतात ( देहभानावर येतात ). प्र-हादही या अतःस्थ वासनेमुळेच शंखाचा शब्द ऐकून जागा झाला. पण समाधीत श्रोत्रंद्रियही लीन झालेले असल्यामुळे तो शब्द त्याला ऐकू कसा गेला म्हणून म्हणशील तर सांगतो. हरि सर्व भूताचा आत्मा आहे. यास्तव त्याच्या मनात जसा प्रतिभास होतो, तसेच सर्व होते. त्याचा सत्य सकल्पच या सर्वांचे कारण आहे. 'प्रन्हाद आता देहभानावर येवो' असे जेव्हा त्याने मनात चिंतन केलें तेव्हा एका क्षणात त्याप्रमाणे घडले. स्वत: कारणशून्य पण भूताचे कारण (अब्याकृत ) अशा त्याने आपल्यामध्येच जग उत्पन्न करण्याकरिता वासुदेवमय शरीर धारण केले आहे आणि असा प्रकार असल्यामुळे त्या माधवाच्या भाराधनेने आत्मदर्शन सत्वर होते व आत्मदर्शनाने त्याचे दर्शन सुलभ होते. यास्तव राघवा, तूही याच दृष्टीचा आश्रय करून विहार कर. म्हणजे तुला ते शाश्वत पद प्राप्त होईल. दुःखाचा वर्षाव करणान्या संसारमेघानी हृदयाकाशास आच्छादित केल्यामुळे विचारसूर्य दिसत नाहीं आणि त्या कारणाने मौख्यं पसरते. पण एकादी यक्षीण मंत्र्याला जशी पीडा देत नाही त्याप्रमाणे मात्मप्रसादवान् धीराला विष्णूची ही अति भासर माया बाधा करीत नाही. आत्म्याच्या इच्छेनेच संसारजाल रचणारी माया वाढते व योग्यसमयीं क्षीण होते. यास्तव सात्त्विक राजपुत्रा, तू पापली शुद्ध वासना पुष्ट कर ४२. सर्ग५३-ज्ञान ईशप्रसादप्राप्य असले तरी आपला प्रयत्न व इंद्रियजय यांच्या गोगानेच ते संपादन करावें. श्रीराम-भगवन् , चंद्राच्या किरणांनी औषधी जशा तृप्त होतात त्याप्रमाणे आपल्या या वचनामृताने आम्ही सर्व तृप्त झालों भाहों. हातांत