पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपसमप्रकरण-सर्ग ४१. ७५९ झाली आहे. समाधि व व्युत्थान या दोन्ही दशेत मी एकसारखीच. भावना ठेवतो. हे महादेवा, निर्मल बुद्धीने मी तुला फार दिवसापासून आतल्या आत पहात होतो. पण तोच तू आता मला या बाह्य दृष्टी- नेही साक्षात दिसत आहेस. हे महेश्वरा, मी या सर्वसंकल्पशून्य अनंत दृष्टीमध्ये जो आजवर स्थित होतो तो शोक, मोह, वैराग्यचिंता, देह- त्याग, संसारभय इत्यादिकातील कोणत्याही निमित्ताने नव्हे. कारण एका परम तत्वाचा साक्षात्कार झाल्यावर शोकादिकाना अवकाश कोठून रहा- णार ! मी विश्रांतीच्या विचारजन्य इच्छेमुळेच समाधिस्थ झालो होतो. अप्रबुद्ध जन ' हाय हाय मी विरक्त झालो आहे. आतां देहत्याग करतों' इत्यादि अनेक संकल्प करून व्याकुळ होत असतात. हे सुख, हे दुःख, हे आहे, हे नाही, इत्यादि प्रकारे चंचल होणारे चित्त मूढ होय. मी निराळा व हा निराळा ही आत्मबुद्धिशून्य अज्ञाची वासना आहे. पण हे त्याज्य व हे ग्राह्य हा मिथ्या मनोभ्रम दुर्बुद्धि अज्ञाप्रमाणे सुज्ञाला उन्मत्त करीत नाही. हे कमलनयना, तूच सर्वाच्या अंतर्यामी आहेस, व जगत् असत् आहे. तेव्हा त्यात ग्राह्य किंवा त्याज्य काय असणार ? यास्तव हे नारायणा, मी द्रष्टा व दृश्य याचा विचार करीत असताना असाच स्वाभा- विकपणे क्षणभर विश्रात झालों व एवढा वेळ त्याच भावाभाव-शून्य स्थितीत राहून आता तुझ्या इच्छेने पुनः देहभानावर आली आहे. परमा- त्मन्, मला माझें सर्वस्व मिळाले आहे. यास्तव आता तू जे सागशील ते मी करीन. हे पुंडरीकाक्षा, तूं त्रिभुवनात परमपूज्य आहेस. यास्तव शास्त्र व लोक-नियति याच्या योगानें प्राप्त झालेली पूजा मजपासून ग्रहण कर. असे बोलून दानवाधीशाने त्या देवास अर्ध्य समर्पण केले आणि आ- युध-देवता, अप्सराचा सघ, देव व गरुड यांसह श्रेष्ठ गोविंदास पूजलें. तेव्हां पूजा करून, समोर हात जोडून बसलेल्या दानवेशास भगवान् कमलापति म्हणाला, “प्रन्हादा, ऊठ. सिंहासनाचा स्वीकार कर. म्हणजे मी स्वतः तुला राज्याभिषेक करीन. माझ्या पाचजन्याचा ध्वनि ऐकून येथे झालेले हे सर्व सिद्ध, साध्य व देव तुझें सुमंगल करोत.” असें बोलून पुंडरीकाक्षाने दानवास सिंहासनावर बसविलें. नंतर हरीने बोलाव - त्यामुळे आलेल्या समुद्र, नद्या व तोय यांच्या जलांनी देव-ऋषि-मुनि-