पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्ठसार. भूतें राहोत, की जावोत; ती नाश पावोत की वाढोत; ज्ञानी भात्म्या- मध्येच रहातो. अनात्म वस्तूचा क्षय झाला तरी परमेश्वर क्षीण होत नाही व त्याची वृद्धि झाली तरी याची वृद्धि होत नाही व हे शरीर चेष्टा करीत असले तरी तो कोणतीही चेष्टा करीत नाही. मी देहसंबंधी देही भाहे, हा चित्तभ्रम गेला झणजे मी टाकतो किंवा टाकीत नाही ही व्यर्थ कल्पना कधी होत नाही. हे टाकून हे घेतो, हे करून हें करतो, इत्यादि संकल्प तत्त्ववेत्त्याच्या चित्तात उद्भवत नाहीत. ज्ञानी व सर्वकर्ते पुरुष काही करीत नाहीत. कारण ते अकर्तृ-पदास पोचलेले असतात. अकर्तृत्वामुळे त्याचे अभोक्तृत्वही अथेसिद्ध आहे. कारण ज्याने पेरलेच नाही तो घेणार काय कर्तृत्व व भोक्तृत्व नाहीसे झाले की शाति रहाते व तीच प्रौढ झाली असता मुक्ति होते. ज्ञानी सदा जागे ( सावधान) शुद्ध व चिन्मय असतात. प्राह्य-प्राहकसबध क्षीण झाला की शांति उदय पावते व तीच स्थिर झाली झणजे मोक्षरूप होते. तसल्या सर्वोत्तम शातीमध्ये स्थित मसलेले तुझ्यासारखे उत्तम पुरुष निजलेल्या पुरुषाच्या अग-चाळव- ण्याप्रमाणे निर्हेतुक व्यवहार करतात. याम्तव हे प्रल्हादा, प्रारब्धाचा क्षय होई तो तही वासना-शून्य मनाने राज्यपालन कर, ज्याचे चित्त स्वात्म्या- मध्ये तल्लीन झालेले असते ते तुझ्यासारखे पुरुष रम्य अनात्म वस्तूंमध्ये रत होत नाहीत व आत्मसुखाचा आतल्या आत स्वाद घेणारे ते संत आत्म्याशी सबंध न ठेवणान्या दु.खामुळे दुःखी होत नाहीत. नित्य प्रबुद्ध पडित आरशातील प्रतिक्विाप्रमाणे प्राप्त कार्याचे ग्रहण मनि- च्छेने करतात. यास्तव हे दैत्येश्वरा, तू आता अशाच स्थिर चित्ताने ब्रह्ममय होऊन, ब्रह्मदेवाच्या एकच दिवस, गुणानी भरलेल्या राज्यलक्ष्मीचा उपभोग घे व नतर हे महात्म्या अग्युत परमास्पदास जा ४०. सर्ग ४१-देन्याने केलेल्या पूजेचा स्वीकार करन गर्न त्याला दैत्य-राग्यावर अभिषेक केला व वर मागावयाम मागितले. श्रीवसिष्ठ-भगवानाचे हे शांत व गंभीर वचन ऐकून प्रन्हादनामक देह मानंदाने असें बोटला- देवा ! हित व अस्ति यांच्या विचारांनी भरलेली शेकों राज्य. कार्य करून मी भगदी थकलों व त्याकरिता एक क्षणभर विश्रोति घेत बसलो होतो. भगवन् , मापस्या प्रसादाने मला उचम स्थिति प्रात