पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १०. जरी पर्यालोचन केले तरी तत्वज्ञाला मरण संभवत नाही. कारण देह- त्यागालाच मरण झणतात. पण तत्त्वज्ञाला सत् आरम्याच्या योगाने अथवा बसत देहाच्या योगाने ते संपादन करितां येत नाही. कारण मात्मा सदा पक्रिय व असंग असल्यामुळे त्याच्याठायीं त्यागक्रिया अथवा देहासक्ति संभवत नाही. असत्-देह भापलाच त्याग करील म्हणन सणावें तर ते अगदीच अशक्य आहे. स्वात्म्याचे ज्ञान हेच देहादिकाच्या अज्ञानाचें कारण आहे. असो; ज्याची मति स्वारमतत्त्वदर्शनापासून कधी हटत नाही, ज्याला अहंकार-भाव नाही, ज्याची बुद्धि पुण्य-पापकल्पनानीं लिप्त होत नाही, जो सर्व भूतामध्ये समभाव ठेवतो, जो राग-द्वेषशून्य शीतळ बुद्धीने साक्षीप्रमाणे हे दृश्य पाहतो, आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे ग्राह्य-त्या- ज्यभाव सोडून आतल्या आत जो साक्षीमध्ये चित्त लावतो, सत्य दृष्टीचा आश्रय करून जो लीलेने जगत्क्रिया करतो, ज्याला इष्टानिष्ट प्राप्तीमुळे संतोष व उद्वेग होत नाही, सरोवरावरील मेघाप्रमाणे ज्याच्यापासून गुण- संघ निघतो व ज्याचे नाव कानी पडताच प्राणिमात्राला आनंद होतो त्याचेच जीवित शोभते. यास्तव हे सजना, तु प्राण्याचे सरक्षण करून आपल्या अवशिष्ट जीविताला सफल कर ३९. सर्ग ४०-ज्ञानी पुग्णाने सदेह असूनही विदेहाप्रमाणे व कूटस्थ असूनही क्रिया- पर असल्याप्रमाणे कसा व्यवहार करावा त्याचे दिग्दर्शन. श्रीभगवान-लोक दृष्ट देहाच्या स्थैर्यालाच जीवित व दुसरा देह धारण करण्याकरिता एका देहाचा त्याग करणे, यास मरण म्हणतात. पण हे महामते, तू या दोन्ही पक्षापासून मुक्त झालेला आहेस. तेव्हां तुला मरण कसले व जीवित कसले ? पण केवल ज्ञान व अज्ञान याच्या गुण- दोषांचा प्रपंच करण्याकरिता मी 'अमुक जीवित शोभते व अमक्याचे मरण शोभते' असें तुला सागितलें. तू वस्तुतः जिवंत रहात नाहीस व मरतही नाहीस. देहामध्ये असूनही ' देहच मी ' अशी भावना नसल्या. मुळे तूं विदेहच आहेस. तं ज्ञानी आहेस. तूं सर्वदा सत् आहेस. तूं पर चित्प्रकाश आहेस. तेव्हा तुला देह कोणता व अदेह कोणता? तिकडे वसंतोदय हावो की प्रळयवायु सुटो भावाभावहीन असलेल्या आत्म्याला त्याचे काय? तो काही झाले तरी आपल्या स्वरूपातच रहाणार! सर्व