पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग ११. ७३ व कष्टकर ससारांत मी कसा आलो असे शब्द माझ्या तोडातून निघाले. ते ऐकून तो दयाल पिता ह्मणाला-" बाळका, तू असा दुःखी का झाला आहेस ? दुःखाचे निवारण कसे होईल हीच चिता असली तर मला विचार; ह्मणजे नित्य मुखी होशील, " हे ऐकताच " हे प्रभो, प्रा- ण्यास हा महा दुःखमय ससार कसा प्राप्त झाला व तो क्षीण कसा होणार?" असा प्रश्न मी त्यास केला. तेव्हा त्या लोककत्योने ससार-व्याधीवरील अव्य- भिचारी ( रामबाण ) औषध मला सागितले. त्याने सागितलेले ते बहुत प्रकारचे ज्ञान अति पवित्र असून चित्तास तात्काल शाति देणारे आहे. असो, मला सर्व काही ज्ञात झाले आहे व मी कृतकृत्य झालो आहे, असे जाणून सृष्टिकता मला पुनः ह्मणाला, " पुत्रा तुला शाप देऊन व अज्ञ बनवून मी पृच्छक तयार केला, व सर्व लोकाच्या उपयोगी पड- णारे हे ज्ञान सागितले. आता माझ्या कृपनें तुला तुझे स्वाभाविक ज्ञान प्राप्त होईल. तू भूलोकी जा, व जबूद्वीपातील भरतवर्षस्थ लोकावर अ- ग्रह कर. कारण तेथील लोक वैदिकमार्गावलबी आहेत ते कर्मकाडात पूर्वीपासूनच तत्पर झालेले आहेत. पण त्यामुळे त्याचे ससारदुःख नाहीसे होत नाही. यास्तव कर्मकाडाच्या अनुरोधानेच तू त्यास हे ज्ञान साग. तुला जे कर्मकाडाचे अविकारी आढळतील त्यास श्रद्धापूर्वक कमोनुष्ठान करावयास लाव व जे विरक्त, आणि विचारी असतील त्यास ज्ञानाचा उपदेश कर." राघवा, याप्रमाणे पित्याची आज्ञा झाली असता मी या लोकी आलो, व त्याच्या इच्छेप्रमाणे मला, ही लोकपरपरा असे पर्यत, कोणत्याना कोणत्या तरी रूपाने अविकान्यास ज्ञानाचा उपदेश करीत येथें रहावयाचे आहे मला स्वत करिता काही करावयाचे नाही. तरी आपला नियोग पुरा करण्याकरिता मी उन्मनी-अवस्थेत सदा रहातो. माझे चित्त निजल्याप्रमाणे शात असते व मी कोणतीही क्रिया करीत नाही. १०. सर्ग:११-वर सागितलेल्या ज्ञानावताराचा विस्तार, रामाच्या वैराग्याचा प्रशसा ___ आणि वक्ता व पृच्छक याची लक्षणे याचा या सर्गात समावेश केला आहे. श्रीसिष्ट-- रामा, या लोकी ज्ञानाचा अवतार कसा झाला,ते मी तुला सागितले. या माझ्या पित्याने मजप्रमाणेच सनत्कुमार, नाग्द इत्यादि दुसरेही अनेक मुनि या लोकी पाठविले व त्याच्या उपदेशाने कर्ममार्ग