Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५९ बृहयोगवासिष्ठसार, शरीरावर पसरली. सूक्ष्म शरीरांत चित् प्रतिबिंबित झाली व ती विष- योन्मुख होताच मनाचा व्यापार सुरु झाला. काळ्या भोर नेत्रांत सुंदर तेज चमकू लागलें. प्राणापानगति सुरू झाली व इतक्यात 'सावध हो; देहभानावर ये.' असे प्रभूनें गंभीर वाणीने पुनः म्हटलें असतां तो चांगला जागा झाला. तेव्हां भगवान म्हणतो-बा साधो, भापली महा लक्ष्मी व आकृति यांस भाठव, तूं उगिच अकाली देहविराम का करतोस! ग्राह्य व त्याज्य या संकल्पांनी शून्य असलेल्या तुझ्या शरीरांतील भावा- भावांनी तुझी कोणती हानि होणार आहे ? यास्तव ऊठ. तुला या देहाने असेच येथै एक कल्पभर रहावयाचे भाहे. तुझ्या आयुष्याची मर्यादा आम्ही जाणतो. जीवन्मुक्त झालेल्या तू आता, राज्य करीत, राहिलेलें आयुष्य घालवावेम. कल्पाती मातीच्या घागरीप्रमाणे हे शरीर विशीर्ण झाले ह्मणजे तूं स्वमहिम्यामध्ये स्थित होशील. ही तुझी जीवन्मुक्तांचे विलास करणारी शुद्ध तनु कल्पातापर्यंत रहाणारी आहे. मग तूं वारा आदित्याचा उदय, पर्वताची धूळ, व भूगोलाची रख होण्यापूर्वी व्यर्थ तिचा का त्याग कर- तोम ? कल्पात वायु अजून वाह लागलेला नाही. त्रैलोक्य जळले नाही ! पुष्करावर्तादि मेघ अजून भयकर विजेमह आकाशात उटले नाहीत. दिशा अजून निराधार झाल्या नाहीत ब्रह्मा, विष्णु व रुद्र हे नानच देव अजून या जगांत अवशिष्ट राहिलेले नाहीत! मग इतक्यात तु शरीर का टाक. तोम ? मी जरायुजादि चतुर्विध प्राण्यांनी व्यापिलेल्या या दशदिशामध्ये विहार करीत असताना आपल्या शरीराचा त्याग करणे, तुला शोभत नाही. या सृष्टीची रचना अजून जशीची तशीच आहे. तु भिऊ नकोस. बा प्रहादा, अज्ञानामुळे ज्याच्या मनाम दु.ग्वें तोडीत असतील, मी दुःखी भाहें, मूढ आहे, कृश आहे इत्यादि भावना ज्याच्या मतीस व्याकुळ करीत अमनील; चचट मनोवृत्ती ज्याला आतल्या भात शेकडों भाशापाशांनी बांधून इतस्ततः मोटीत असतील; तृष्णा ज्याच्या हृदयाला एकसारख्या खात असतील, ज्याच्या उच मनोवनातील चित्तवृत्तिलता सुख-दुःख- फलांनी भरली अमेल, ज्याच्या देहारण्याम आधि-व्याधिरूप वणवा लागला असेल, ज्याच्या शरीररूपी शुष्क वृक्षाच्या ढोलीत काम व क्रोध हे दोघे जीर्ण अजगर आनंदाने रहात असतील त्याला मरण शोभते. तुझ्या सारख्या भानदी जीवाला ते शोभत नाही. मरणाच्या सरूपाचे