पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १९. ७४१ यास्तव मातां भगोदर रसातळास जाऊन मी प्रन्हादाला सावध करतो व राज्य करावयास लावतो. त्याच्यावाचून दुसन्या कोणाला जर दानवराज केले तर तो देवांचा पराभव करील. प्रन्हादाचा हा शेवटचा पावन देह भाहे. या कल्पाची समाप्ति होई तो त्याला या देहानेच रहावयाचे आहे. कारण परमेश्वराची इच्छारूपी नियति-देवी अशी आहे. याम्तव त्यालाच जाऊन जागे केले पाहिजे. जीवन्मुक्ताच्या असंसक्तिलक्षण समाधीमध्ये स्थित असलेल्या व त्यामुळेच मनश्चेष्टारहित झालेल्या त्याला अमुरनायता करूं दे. म्हणजे सुरासुरांसह हा सगे नष्ट होणार नाही. त्याचे परस्पर युद्ध चालेल व त्यामुळे माझा खेळ होईल. यद्यपि मला जगाचे उदयास्त एक- सारखेच आहेत तरी हे आहे तसेंच राखणे, उचित होय. थोड्याशा प्रयत्नाला भिऊन याचा नाश होऊ दिल्यावर मला दुसरा सर्ग घेऊन तरी काय करावयाचे आहे ? तेव्हा आता ठरल्याप्रमाणे करावे, हेच बरे ३८. सर्ग३९- हरीने दैत्यपुराम जाऊन शखनादाने प्रहादास सावध केलें व कप- पर्यंत राज्य कर, असे सागितलें. श्रीवसिष्ठ-राघवा, असा मनात विचार करून तो सर्व परिवारासह क्षीरसागरातील आपल्या नगरातून निघाला व त्याच्याच तळरध्रातून प्रन्हा- दपुरास आला. हरीने सोन्याच्या मंदिरात, मेरूच्या गुहेत समाधि लावून बसलेल्या ब्रह्मदेवाप्रमाणे, समाधिस्थ देयेंद्रास पाहिले. भगवान् दैत्यनगरात जातांच सूर्यकिरणास भिऊन उलूक जसे पळून जातात व अधकारात लपून बसतात त्याप्रमाणे तेथील दैत्य त्याच्या तेजास भिऊन पळून गेले. तेव्हा दोन-तीन मुख्य असुरांसह आपल्या परिवाराने वेष्टित झालेला तो सुरेश, आकाशात येणाऱ्या तारायुक्त चंद्राप्रमाणे, असुराच्या गृहांत शिरला. गरुडाच्या पाठीवर बसलेल्या त्याला लक्ष्मी वारा घालीत होती. चक्रादि श्रायुधे त्याच्याबरोबर होती आणि देव, ऋषी व मुनी त्याला वदन करीत होते. असो; प्रहादापाशीं जातांच 'हे महात्मन, ऊठ' असें बोलून त्याने मापला पाचजन्य वाजविला. त्याच्या नादाने सर्व दिशा दुमदुमल्या. नग- रांतील आबालवृद्ध दानव भयभीत झाले व दानवेशही हळु हळु सावध झाला. कोमेजलेल्या वेलीला पाणी घातले असता ती जशी टवटवीत होते त्याप्रमाणे हळु हळु त्याच्या सर्व प्राणशक्ती, अंगभर पसरल्या. उदया- नंतर सूर्यतेज जसें भूमंडलावर सर्वतः पसरतें त्याप्रमाणे त्याची प्राणश्री