पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार शय्येवर बसलेल्या व सर्वांच्या अंतःकरणांत संचार करणान्या भगवान् गदाधराने आपल्या अति भास्वर मनःशरीराने असें चिंतन केले.- भरे भरे, माझा परम भक्त प्रन्हाद निजपदी विश्रांति घेत राहिल्या. कारणाने पाताळलोक निर्मायक झाला व त्यामुळे प्रायः ही सृष्टि दैत्यरहित शाली माहे. दैत्यांचा अभाव झाल्यामुळे देव शांत झाले आहेत. पण आतां त्यामुळे भूलोकी होणाऱ्या यज्ञ-तपःक्रिया बंद पडतील. कारण दैत्य व देव (अर्थात् सत् व असत् वृत्ती) जोपर्यंत एकमेकांशी द्वेष व कलह करीत असतात तोपर्यंतच स्वर्गसुख दुर्लभ झालेले असते. पण त्यांतील दुष्ट दैत्याचा नाश होऊन साधु देव शात झाले म्हणजे क्षुद्र स्वर्ग- तर एका बाजूलाच राहू दे; पण साक्षात् मोक्षही सुलभ होतो. यास्तव देवत्वाची प्राप्ति होणे हा मोठासा पुरुषार्थ आहे, असे लोकाना वाटेनासे झाले म्हणजे मग त्याकरिता श्रुति-स्मृतिप्रोक्त कमें कोण करणार! कर्माचा लोप झाला म्हणजे भूटोकाचा क्षय झाल्यावाचून रहाणार नाही माणि मनुष्यलोकाचाच अभाव झाल्यावर सर्व ससाराचाच बस होण्याचा प्रसग येणार. पण तो मला इष्ट नाही. कारण त्यामुळे मी 'प्रलयापर्यत रहावें। भशा सकल्पानें कल्पिलेल्या या जगाचा अकाली नाश होईल. म्हणजे नियतीचा क्षय होणार. पण तसे होणे अगदी उचित नव्हे आणि कदा- चित् तसे घडल्यास स्वतःच्या लीलेचाच क्षय करणान्या मी काही केले नाही, अथवा करण्यास समर्थ नाही असेंच होणार ! शिवाय एकाद्या संसारा- सक्त पुरुषाचा सर्व परिवार अकम्मात् कालाग्या अधीन झाला असता त्याला जसा सवे प्रपच शून्य वाटतो त्याप्रमाणे आकाश, चद्र, सूर्य, तारा इत्यादि सर्व खेळण्याचा क्षय झाला असता मलाही मापस्या लीलाशरीराचा उपसहार करून पुनः संसार न करण्याकरिताच पूर्णात्मपदी टीन न्हावे लागेल. पण माझा अधिकारकाल अद्यापि संपलेला नसल्यामुळे, भर तार- ण्यात मरणान्या पुरुषाप्रमाणेच, माझा टयही दुःखद होय. सारांश दैत्यांच्या राज्यांत अशी अव्यवस्था होऊन त्यामुळे सर्व जगाचा क्षय व्हावा, हे भगदी अनुचित आहे. त्यात कल्याणाचा लेशही नाही. यास्तव दानवांचे रक्षण मला केलंच पाहिजे. त्यांच्या भीतीने देवही माळस सोडून स्वसं- रक्षणाविषयी सावध राहतील. त्यामुळे पहादिक्रिया सुरळीत चालतील व संसाराची सुस्थिति होईल.