पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २६. त्यांच्या विषयाचे ग्रहण करणारा तूं अप्राप्य कसा असशील ! वेद, शास्त्रे व पुराणे ज्याचे सतत गायन करीत आहेत त्याचे एकदां दर्शन झाल्यावर पुनः विस्मरण कसे होईल ? हे आत्मदेवा, तंच या सर्वांचे धारण के माहेस. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे की तुं मद्रप झाला आहेस व मी त्वद्रूप झालो आहे. भामच्यामध्ये भाता भेद राहिलेला नाही. महेश्वरा, तुला नमस्कार असो. तुज परमाणुरूपामध्ये वटबीजातील वटवृक्षाप्रमाणे त्रिकाली सर्व जग आहे. भाकाशात मेघ जसे घोडा, हत्ती, रथ इत्यादिकाच्या आकाराचे दिसतात त्याप्रमाणे हे देवा, तूही शेकडों पदार्थाच्या भ्रामक स्वरूपाने प्रकट होतोस. हे देवा, फार दिवस व्यर्थ कष्ट भोगल्यावर मला तुझा लाभ झाला आहे. मी आतां मुक्त झालो आहे. माझ्यासारखीच ज्यांना मुक्ति पाहिजे असेल त्याने मान, मद, कोप, कालुष्य व क्रूरता सोडावी. कारण महात्मे प्राकृत गुणसंकटामध्ये निमग्न होत नसतात. मागची दीर्घ दुर्दशा कशी असह्य होती, याचे स्मरण ठेवून मी कोण व हे काय झाले आहे? याच्या विषयीही चागला विचार करावा. अरे बा माझ्या आत्म्या, ते मोठे प्रयास व भयंकर दिवस आतां निघून गेले आहेत. तुझा प्रतिकूल काल जाऊन आता अनुकूल काल आला आहे. तूं भाता या माझ्या देह- नगरात राजा झाला आहेस. आता तुला सुख-दुःखाविषयी फारशी चिंता करावयास नको. इद्रिय-घोड्यांस व मनो-गजांस जिकून आणि भोगशत्रूचा सर्व प्रकारे पराभव करून आता तूं साम्राज्यावर बसशील. तूं आता भपार आकाशातील प्रवाशी झाला आहेस. तुझ्यामुळे जगाचा अस्त व उदय होतो. आंत व बाहेर प्रकाश पाडणारा तूं भास्कर आहेस. हे प्रभो, तूं सदां निज- लेला आहेस. पण एकादी कामिनी भोगलीलार्थ आपल्या कामुकाला जशी उठविते त्याप्रमाणे तुझी शक्ति तुला जागें करिते. इंद्रिय-वृत्तिरूप माशांनी दुरून आणलेला रूपादिलक्षण मध नेत्रादि वातायनात बसलेल्या तुज चिच्छक्तीकडून यथेच्छ प्याला जातो. हे आत्मन् , मरणसमयी योग्याना सुषुम्नादि मार्ग दाखविणाराही तूंच आहेस. देहरूपी पुष्पांतील वास तूं आहेस. देहचंद्रातील तूं अमृत आहेस. देहशाखेतील रागादि-पल्लवाच्या उद्भवास कारण होणारा रस तूंच आहेस. शरीररूप दुधांतील सार असा जो तूं त्या तुजमध्ये विस्मयस्नेह माहे. काष्ठातील अग्नीप्रमाणे तूं या शरीरांत स्थित आहेस. तूंच अमृतरूप अत्युत्तम स्वाद आहेस; सूर्यादिकांच्या प्रकाशाचें