पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ उपशमप्रकरण-सर्ग ३९. हवामि मुळीच रहात नाहीत. तुज पानंद-पर्वतास नमस्कार असो. आत्मन्, तुज प्रफुल्ल आनंद कमलास मी नमस्कार करतो. निष्फल, अमृतरूप, सदा उदित व पूर्ण भात्मचंद्रास, संविद् व आमास या पंखांनी युक्त असलेल्या व हृदय कमलांवर रहाणान्या मानस-हंसास, सदा उदित, शांत, हृदयांतील महा-अंधकाराचे हरण करणान्या व सर्वग असूनही अदृश्य चित्सूर्याला, पर प्रेमरूप स्नेह-दीपाला, सर्व वृत्तींचे उल्लघन करून रहा- णाराला व सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या आधाराला मी नमस्कार करतो. पोलादी टोकीने तापलेले लोखंड जसे तोडतात त्याप्रमाणे मी शमादि युक्त मनाने मदनसंतप्त मनाला तोडले आहे. अंतर्मुख इंद्रियांना मी प्रतिबंध केला आहे आणि ' मी आनंदात्मा आहे' या शुद्ध अहंकाराने ' मी जरा- मरण-धर्मवान् अनात्मा आहे' या मलिन अहंकाराला जिंकलें आहे. त्या- मुळे मी माता केवल चित् राहिलो आहे. श्रद्धेने अश्रद्धेला, वैराग्याने तृष्णेला, व ऊहापोहवती प्रज्ञेनें अविचार-सदेहादि-लक्षण प्रज्ञेला क्षीण करून मी ज्ञातृत्वाभिमानरहित असल्यामुळे अज्ञ व इप्तिमात्रस्वभाव मस. त्यामुळे ज्ञ झालो आहे. मन निरहंकार होऊन, ब्रह्माहंभावाने देहाहंभाव गळला असता, मी आता स्वच्छ व केवल होऊन राहिलों आहे. अंत:- करणाच्या चारी भावांचा अभाव झाल्या कारणाने मी आता जीवन्मुक्तावस्थेत स्थित आहे. माझे हे सुख स्वभक्तावर मोठमोठे अनुग्रह करणा-या ब्रह्म-रुद्रा- ठिकान्या सुखाहूनही अधिक आहे. मी आता सर्व दुःखशून्य झालो आहे. दरहकाररूपी पक्षी तृष्णारज्जु तोडून माझ्या देहपिंजऱ्यातून कधी निधन गेला काही कळत नाही. अहंभावपक्षी शरीरवृक्षावरून कोठे उडून गेला, कोण जाणे ! अहंकाररूपी महा मेघाने सोडल्याकारणाने मी भाता महा मतिमान् झालो आहे. त्या कारणानेच मी हा भगवान आत्मा पाहिला. त्याचा मला साक्षात्कार झाला. समाधीमध्ये मी त्याला दीर्घ काळ घट्ट आलिंगन दिलें व व्युत्थानदशेतही आपल्या देहाप्रमाणेच सदा स्वानुभवा- मध्ये त्याची योजना केली. निर्विषय,मननरहित, इच्छाशून्य, अहंकारशून्य, चेष्टारहित व भोगोत्कंठारहित झालेलें माझे मन निरिंधन (काष्ठरहित)मग्री- प्रमाणे शांत झाले आहे. दुरुचर, सम व विषम महा-आपचीनी युक्त, सुदुःसह आणि उत्पचिरूप दीर्घ दोष देणारे सर्व अनर्थ मनः-शांतीमुळेच