पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७५४ वृहयोगवासिष्ठसार. व्याचे आहे, ते काही कळत नाही. मला भोगस्थितीची अथवा भोगांस वर्ज करण्याची इच्छा नाही. जे येत असेल तें येऊं दे व जात असेल तें जाऊं दे. मला सुखाची अपेक्षा नाही व दुःखाची मी अपेक्षा करीत नाही. नाना प्रकारन्या वासना देहामध्ये उदय पावोत की अस्त पायोत. मी त्यांच्यामध्ये नाही व त्या माझ्या नाहीत. आजपर्यंत अज्ञान-शत्रने मला मारून टाकलें होते. त्या चोराने माझे सर्व विवेक-सर्वस्व लुटून मला एका कोपन्यांत गाडून ठेवले होते. पण आता भापोआप झालेल्या या विष्णूच्या महाप्रसादानें मला माझे ज्ञान होऊन मी सुटला आहे. महंकार-पिशाचाला मी या शरीररूपी वृक्षाच्या ढोलीतून आत्मज्ञानमत्रान दृर घालवून दिले आहे. त्यामुळे अत्यत पुण्यकारक झालेला माझा हा शरीरवृक्ष आता प्रफुल्लित झाल्यामारखा दिसतो. माझें मोह-दारिद्य नष्ट झाले. दुराशा दोष क्षीण झाले व विवेक-धन-सभार मिळाल्यामुळे मी आतां परमेश्वर बनला आहे. मी सर्व ज्ञातव्य जाणलें; द्रष्टव्य पाहिलें व सर्व प्राप्तव्य प्राप्त करून घेतले आहे. मी आता सर्व अनर्थशून्य पारमार्थिकी भूमीस प्राप्त मार्ग आहे. स्तुति, प्रणाम, प्रार्थना, शम व नियम याच्या योगाने हा भगवान् मात्मा मला प्राप्त झाला आहे. अहकारान्याही पलीकडे असलेल्या सर्व व्यापी सनातन ब्रह्मात्म्याची भाज मला फार दिवसांनी स्मृति झाली. या अहंकारशत्रने मला फार दिवस उत्कर्ष-अपकर्षरूप शेकडो दशांमध्ये, आविर्भाव व तिरोभाव इत्यादिकान्या योगाने इंद्रियरूप सपोशा विळामध्ये, मरणरूप मोठमोठ्या खड्यामध्ये, तृष्णारूपी कांटेन्या जंगलांमध्ये, कामरूप कोलाहलामध्ये, वामना-वनामध्य, जन्मरूप कूपामध्ये व दुःखरूप वणव्या- मध्य घालून नानाप्रकारचे दुःख दिले. पण माता शौरीने केलेल्या अनुः ग्रहामुळे माझी विवेकदृष्टि उघडली आहे. त्यामुळे मला तो महंकार-राक्षस दिसत नाही. मनोरूप विवरामध्ये रहाणारा महकारयक्ष भाता कोठे गेला तेही मला कळत नाही. चोराध्या हातांतून आपल्या सर्व निधीसह सुटल्यामुळे मी माता भति सुग्वी झालो आहे. मोह. दःख. दुराशा, भाषी, नरक, स्वग, मोक्ष इत्यादि भ्रम अहंकारामुळेच होतात.नानाप्रकारच्या मितीवरील चित्राना असा एका मितीचाच भाधार असतो त्याप्रमाणे सर्व बनर्थोना या दुष्ट महंभावाचा आधार माहे. हे भारमन, निरहंकार, प्रसनभानदात्मा भशा तुला नमस्कार असो. तुज मानंदसागरात इद्रिय माहव विचा