Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. जाची कर्णिका आहे, दिशा ह्याच ज्याच्या पाकळ्या आहेत; व नक्षत्रा- सह तारागण हीच ज्याची केसरे आहेत अशम - हृदयकमळ्यपासून वेद व वेदार्थ यास जाणणारा आणि देव व मुनि याच्या मडलाने मंडित असलेला परमेष्ठी निर्माण झाला. त्यालाच ब्रह्मदेव किवा पितामह ह्मणतात. मनुष्याचे मन ज्याप्रमाणे सकल्पविकल्पाचे ओघ निर्माण करिते त्याप्रमाणे त्याने ही सर्व सृष्टि निर्मिली. जबू-द्वीपाच्या या भारतवर्षसज्ञक एका कोनात आधिव्याधियुक्त, जरामरणसपन्न, लाभ व अलाभ याच्यायोगाने खिन्न व नाना सकटानी व्याप्त अशा जीवास उत्पन्न केल्यावर त्याच्या त्या भयकर यातना पाहून त्या स्रष्टयास दया आली. पुत्राचे क्लेश पाहिल्या- वर पित्याच्या मनाची जी अवस्था होते तीच त्याच्या मनाची झाली, व-या हताश झालेल्या' दुःखी जीवाच्या दुःखाचा क्षय कसा बरे होईल असे ह्मणून तो एक क्षणभर विचार करीत राहिला. त्याने प्रथम धर्म, तप, दान, सत्य व तीर्थे उत्पन्न केली, आणि नतर पुनः विचार करून तो ह्मणाला; याच्या योगाने या सृष्टीतील जनाच्या दुःखाचा उच्छेद होणार नाही. ज्याच्या योगाने जनन-मरणादि क्लेशाचाही नाश होतो ते निर्वाण-नामक सुख केवळ ज्ञानानेच प्राप्त होणे शक्य आहे. या ससारातून पार होण्यास ज्ञान हाच एक उपाय आहे. धर्म, तप, दान इत्यादि मव त्या ज्ञानाची योग्यता देणारी आहेत. यास्तव मी आता त्या ज्ञाना- सच प्रकट करितो. असा विचार करून त्या सत्यसकल्प ईश्वराने मला केवल सकल्पाने निर्माण केले. मी कसा व कोठून उत्पन्न झालो, याचे मला मुळीच भान नाही. पण ज्याच्याजवळ कमडलु आहे व हातात स्मरणी आहे अशा त्या पित्यापुढे मी हातात कमडलु व माळ घेऊन उभा आहे, असे मी पाहिले. त्याबरोबर मी त्या स्वामीस नमस्कार केला. तेव्हा “ पुत्रा, ये, " असे ह्मणून त्याने मला आपल्या कमलरूप आसनाच्या उत्तरकडील दलावर बसविले, व तो मला ह्मणाला,-" बा पुत्रा, वानराप्रमाणे चचल व चेष्टा करणारे हे तुझे मन एक क्षणभर अज्ञानात प्रवेश करो." त्या- बरोबर मी विचारशून्य झालो, आपल्या निर्मल स्वरूपास · विसरलो; पूर्वीचे माझे समाधान पार नाहीसे झाले; मी दीन होऊन राहिलो; व एकाद्या निष्काचन मनुष्याप्रमाणे मी शोकसतप्त झालो. " अरेरे या दुष्ट