पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. हूनही अधिक स्पदवान् आहे, स्थाणहूनही अक्रिय माहे; व आकाशा- हुनही निर्लेप आहे. वायु झाडाच्या पानाना जसें हालवितो त्याप्रमाणे हा मनांना क्षुब्ध करतो. सारथि जसा घोड्याना चालवितो त्याप्रमाणे हा डोळ्याच्या पात्यांना वारंवार टववितो व इद्रियाना आपापल्या विषयांकडे जावयाचे सामर्थ्य देतो. एकाद्या भिका-याप्रमाणे हाच देहगृहातील कामात सदा निमग्न असतो व एकाद्या राजाप्रमाणे तोच विभु भोग भोगीत आपल्या राजगृहात स्वस्थ बसतो. यास्तव याचाच सदा शोध करावा, स्तुति करावी, ध्यान करावे. म्हणजे जरा-मरणरूप संमोहातून पार जाता येते. हा अन्यत सुलभ ( नुस्त्या ज्ञानाने प्राप्त होणारा ) व अत्यंत मुजेय ( केवल स्मरणानं वश करण्यास योग्य ) आहे. हा सर्वान्या हृदयकमलाल भ्रमर आहे. दर असलेल्या मित्रादिकांना मोठ्यान हाक मारली असता ते जवळ येतात व जवळच असलेले मित्रादिक नाव घेताच ओ म्हणतात. पण हा स्वतः आत्माच अमल्यामुळे मोठयाने न ओरडता व हलु हाक न मारताच नुम्ता स्मरणाने तत्काल सन्मुग्व होतो. धनिक टोकाची मेवा करू लागल अमता पदोपदी अपमान होण्याचा फार सभव असतो. कारण ते प्राय. धन-मदान मत्त असतात. पण सर्व सपत्तींनी शोभणान्या द्याची कशीही जरी सेवा केली तरी अप. मान होण्याचा प्रमग कधीही येत नाही. पुःपातील वाम, तिळातील तेल व रसाळ पदार्थातील माधुर्य याप्रमाणे हा देव देहामन्ये स्थित आहे. फार दिवमान न पाहिलेल्या बधूप्रमाणे, अविचारामुळे, हा हृदयस्थ चेतनाचीही ओळख पटत नाही. प्रिय मनुष्य भेटले असता जमा अत्यानद होतो त्याप्रमाणे विचाराने या परमेश्वराचे ज्ञान झालं असता परानदाचा लाभ होतो. या श्रेष्ट साप्ताचे दर्शन झाले असना मरणादि विमोद रहात नाही. सर्व बाजूचे आशादि पाश तटातट तुटून जातात. सर्व शग्रंचा क्षय होतो. दुष्ट उदिर जमे घराला पोग्बरतात. त्याप्रमाणे संशय स्याच्या मनाला पोखरीत नाहीत. याचे दर्शन घेतले असता सर्व पाहिल्या. सारखे होते. याचे श्रवण केलें असना सर्व ऐकल्यासारखे होते. याला स्पर्श केला असता सर्व जगाला स्पर्श केल्याचे श्रेय येते व याच्या अस्तित्वाने जगाही भस्तित्व सिद्ध होते. प्राणी निजले तरी हा त्यांच्या मर्ये सदा जागत रहातो. अविचारी लोकांस हाच प्रहार करतो. भाताच्या