पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १५ भनेक शक्ती चित्-तत्वापासून उत्पन्न होतात. सर्व विकल्पशून्य चित् शेकडों पदार्थीमध्ये, सूर्याच्या प्रमेप्रमाणे, एकाच वेळी पडते. चित् झानस्वरूप अस- त्यामुळे तिला त्रिकाल झान असते. पण अशा या शाश्वत कामधेनूल सोहन पुष्कळ हताश लोक संसाररूपी अंधकूपामध्येच खितपत पडले माहेत. या पृथ्वीच्या पाठीवर मशकासारखे असंख्य मूर्ख भाजपर्यंत उत्पन्न, होऊन थोडक्याच दिवसांत व्यर्थ मरून गेले आहेत. पण भोगदुःखाची इच्छा करणाऱ्या त्यांना हे तत्व जर कळते तर त्यांनी आपला जन्म अगदीच निरर्थक केला नसता. इच्छा व द्वेष यांपासून उत्पन होणाऱ्या द्वंद्वमोहाच्या योगाने मानवासारखे बुद्धिमान् प्राणीही पृथ्वीच्या विवरांत रहाणान्या कीटकांसारखे झाले आहेत. सत्य परमात्म्याच्या ज्ञानाने ज्याच्या सर्व तृष्णा शांत झाल्या आहेत तोच खरोखर जिवत आहे. माझ्या अखंड चिदात्म्यास नमस्कार असो. देवा, फार दिवसांनी मी तुला ओळखलें. पर- मात्म्या, आता मी तुला विसरणार नाही. विकल्परूपी चिखलातून मी मोठ्या यत्नानेंच तुझा उद्धार केला आहे. मद्रूप तुज अनंत, शिव, देवा- विदेव परमात्म्यास नमस्कार असो. मी आता या आपल्या स्वाभाविक, स्वयं प्रकट झालेल्या, स्वतंत्र व स्वसंस्थ स्वरूपाला अनन्य शरण आहे ३४. सर्ग ३५-साक्षात् जाणलेल्या आत्म्याचे वर्णन करून, मांतल्या आत प्रणाम करून व त्याच्या बलाने जिंकलेल्या बंधायें अनुसंधान करून प्रहाद आनंदित होतो. प्रहाद-ॐ हाच चिदाकार आहे. तो विकाररहित आहे. या जगांत मसलेले हे सर्व आत्माच आहे. मेद, अस्थि, मांस, मज्जा, रक्त यांहून हा चेतन भिन्न आहे. आत असलेलाही हा दीपक सूर्यादिकास प्रकाशित करतो; अग्नीला उष्ण करतो व रसाला अमृताप्रमाणे गोड करतो. राजा जसे भोग भोगतो त्याप्रमाणे हा इंद्रियांच्या विषयाचे अनुभव घेतो. तो उभा असूनही एकत्र रहात नाही व जात असूनही निश्चल रहातो. शांत भसनही व्यवहारात स्थित आहे व सर्व करीत असूनही लिप्त होत नाही. पूर्वी, भाज, आता, या लोकी, पर लोकी, विहित-अविहित इत्यादि सर्व बचीमध्ये हा सदा सम आहे. तो वस्तुतः निर्भय असतानाही कर्मानुरूप स्वतः उद्भवतो व उद्भवलेले ब्रह्मादिस्तंभपर्यंत भोक्त-भोग्यभाव व चवदा भुवने यांचा निर्वाह केवल भापल्या सानिध्याने करतो. हेच त्याचे कर्मफल होय. सर्वांना याचीच सत्ता असल्यामुळे हा पायू.