पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरणसर्ग ३४. ७२९ हे आत्मतत्त्व सर्व भूतांस अदृश्य वे ज्याचे चित्त क्षीण झाले आहे त्यांसच प्राप्य आहे. कारणाच्या एका भागामध्ये परिमाण होणे हेच जग आहे, असे कोणी म्हणतात. पण त्याच्या या कल्पनेचाही आधार चिदात्माच, कारण त्रैलोक्यात रहाणान्या सोचा हा आत्मा आहे. ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व पदर्थाचा तो प्रकाशक आहे. तो एक, आद्यन्तरहित, सर्वगामी व चराचर भूताच्या अंतःकरणात स्वानुभवरूपानें स्थित आहे. त्या मद्रप आत्म्याची असख्य शरीर जरी असली तरी तो स्वतः एक व अनुभवरूप आहे. आपल्या अनुभवस्वरूपाने तोच सर्व त्रिपुटीमय होतो. हा मी आकाशात सुदर सूर्य-देहाने विहार करीत आहे. वायुदेहानेही माझाच सचार सर्वत्र होतो. माझे हे शरीर नीलवर्ण, शंक चक्र-गदाधर व सर्व सौभाग्याच्या पराकाष्टेने युक्त होऊन या जगात वावरत आहे. भीच कमलोद्भव ब्रह्मा व त्रिनेत्र रुद्र आहे. तापसी जसा मठीचे रक्षण करतो त्याप्रमाणे मी इद्ररूपानें क्रमाने प्राप्त झालेल्या या सर्व त्रैलोक्याचे रक्षण करतो. स्त्री, पुरुष, कुमार, कुमारी, बाल, वृद्ध, उत्पन्न होणार व मरत असलेला मीच आहे. तृण, लता, गुल्म इत्यादिकाचे जीवन मी आहे. चिद्धृमींतून मीच त्याना उठवितो. मातीची खेळणी तयार करण्यात निपुण असलेल्या बालकाप्रमाणे मी आपल्या चित्तविनोदार्थ हे सर्व जगदाडबर रचले आहे. मला सोडून यांतील काही नाही. पुष्पांतील सुवास मी, पुष्पे-पाने इत्यादिकातील काति मी व सर्व पदार्थाचा अनुभव मी. रसतन्मात्र ही आद्य शक्ति असून ती सागर, नदी, सरोवर, विहीर इत्यादिकाच्या जलरूप होते व तीच वृक्ष, शाखा, पल्लव, तृण, अकुर इत्यादिकातील रसरूपाने सर्व कार्यात पसरते. त्याप्रमाणे मीही सर्व कायो- च्या उत्पत्तीचे निमित्त होऊन सर्वत्र पसरलो आहे. स्वतः उत्पन्न केलेल्या कार्यामधे प्रवेश करून विचित्र जीव होणाराही मीच. दुधामध्ये जसें घृत, जलामध्ये जशी रसशक्ति त्याप्रमाणे सर्व भावांमध्ये मी चिच्छक्ति' आहे. भूत, वर्तमान व भविष्यत्-कालचे जग चैतन्यामध्ये स्थित आहे. सर्वत्र रहाणारा विराट व सम्राट् मीच. इंद्राला न बाधता व देवांना शस्त्रास्त्रांनी तोडल्यावाचूनच मला हे अप्रार्थित जगदाज्य मिळाले आहे. मी म्यापी मात्मा आहे. प्रळयकालच्या समुद्राप्रमाणे मी मजमध्येच राहू शकत नाही. समुद्रातील थकलेल्या सर्पाला समुद्राचा जसा अंत लागत नाही त्याप्रमाणे