पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२६ वृहद्योगवासिष्ठसार. करावयाचे नाही. एकादा प्रथम गुणवान् असून मागून निर्गुण हास्यास तो क्रम अनर्थ-पर्यवसायी व त्यामुळेच पुरुषार्थाचा विघात करणारा आहे, असे विद्वान् समजतात. पण एकादा प्रथम निर्गुण असून मागून गुणवान् झाल्यास तो सिद्धि देणारा क्रम आहे, असेंच सर्व मानतात... यास्तव तुझी आपापल्या विचित्र भुवनांस जा. प्रन्हादाची ही भक्तिरूपी गुणिता तुमच्या असुखास कारण होणार नाही." श्रीवसिष्ठ-राघवा, असे सांगून तो देव अंतर्धान पावला. तेव्हां देवही त्याला प्रणाम करून स्वस्थानी गेले. प्रल्हादाविषयीचा त्यांचा क्षोभ कमी झाला. कारण घरातील घडील माणसे ज्याला भीत नाहीत त्याच्यावर लहान वालकही विश्वास ठेवतात, असे आपण व्यवहारांतही पहातो. इकडे प्रहाद भक्तियुक्त चित्ताने प्रत्यही देवाधिदेव जनार्दनाची पूजा करीतच होता. शरीर, मन व वाणी यांच्या द्वारा होणारी प्रत्येकक्रिया तो भगवानास अर्पण करीतच असे. काही दिवसांनी पूजापरायण असलेल्या त्याचे-विवेक, मानंद, वैराग्य, वैभव इत्यादि-गुण वाढले. शुष्क वृक्षाप्रमाणे नीरस असलेल्या भोगाचे त्याने अभिनंदन केले नाही. हरिण लोकसमूहांत जसें रममाण होत नाही त्याप्रमाणे तो स्त्रियाचे ठायीं रममाण झाला नाही. शास्त्रार्थ कथना- बाचून इतर कोणत्याही अशास्त्रीय लोकप्रवृत्तीमध्थे त्याचे मन भासक्त झालें नाही. यात्रादि दर्शनार्ह समाजांत जावे, असे त्याला कधीही वाटत नसे. त्याचे चित्त भोगरूपी रोगांमध्ये कधीही विश्रांत झाले नाही. पण ते भोगादि सर्व कल्पना सोडून शातही झाले नाही; तर पाळण्याप्रमाणे मध्येच झोके घेत राहिले. ___ त्या वैष्णवाची ही अवस्था क्षीरसागरस्थ भगवानाने मतदृदृष्टीने पाहिली व भक्तांस माहाद देणारा तो विष्णु पाताल-मार्गाने प्रहादाच्या देवपूजागृहांत भाला. ते समजताच दैत्याने त्याची मोठ्या भादराने द्विगुण- पूजा केली आणि देवगृहात प्रत्यक्ष येऊन उभ्या राहिलेल्या त्या देवाची मोठ्या मानंदाने स्तुति केली. ती अशी- महाद-त्रिभुवनास सुरक्षिपणे ठेवण्याचा सुंदर कोश, बालभाम्य- तर कलंकाचा नाश करणारा, स्वयंज्योति, मनाथाचा नाथ, शरण जाण्यास योग्य, सर्वशक्तिसंपन्न माणि रजोगुणाच्या योगाने प्रमा, सगुणाने अच्युत व तमोगुणानें ईश्वर होणारा अशा हरीला मी शरण भाडो मार