पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १३. ७२५ दानव कोठे व शेवटच्या जन्मींच महा पुण्याने प्राप्त होणारी जनार्दनाची भक्ति कोठे? भगवन् , प्राकृत पुरुष गुणवान् झाला ही कथा अकाली येणान्या फुलाप्रमाणे सुख व उद्वेग या दोघानाही कारण होत असते. जें ज्याला योग्य नसते ते त्याला शोभतही नाही. काचेच्या ढिगात महामूल्य- वान् रत्न कसें खपणार ? जो ज्या सात्त्विक, राजस किंवा तामस प्रक- तीचा प्राणी असतो तो त्याच स्थितीत रहाणे, हे युक्त होय. सारख्याच रंगाच्या व उंचीच्या बकऱ्यामध्ये कुत्रा कधीं रहात नाही. अयोग्याशी योग्याचा सबद्ध होणे, हे मुज्ञाच्या चित्ताला जितकी पीडा देते तितकी पीडा मगात वज्राच्या सुया टोचल्यानेही होत नाही. कमल जलामध्ये जमें शोभते तसे स्थलावर शोभत नाही कारण ते त्याचे उचित स्थान नव्हे. अधम, नीच कमें करणारा, सत्कर्माचा द्वेष करणारा, दुष्ट व हीन जातीचा एकादा दानव कोठे आणि विष्णुभक्ति कोटें ! यास्तव हे प्रभो, दितिपुत्र माधवभक्त झाला आहे ही वातो माला मुळींच सुख देत नाही १२. सर्ग ३३- हरिभक्तीने दैन्याच्या विवेकादि गुणाचा उदय. हरि प्रसन्न आहे, असे पाहून त्याची स्तुति, श्रीवसिष्ठ-राघवा, याप्रमाणे गर्जना करणान्या व क्षुब्ध झालेल्या देवास शत्रुनाशक माधव म्हणाला. " देवांनो, प्रन्हाद भक्तिमान् झाला आहे हे पाहून तुम्ही उद्विग्न होऊ नका, स्वभावतःच बलाढ्य असलेले दैत्य माझ्या भक्तीने अधिक बलाढ्व होतात, हे जरी खरे आहे, तरी मोक्षास योग्य असलेल्या त्या महात्म्याचा हा शेवटचा जन्म आहे. पूर्वकल्पातील बलीप्रमाणे याला तुमचे राज्य घेण्याची इच्छा नाही. कारण याच्या सारखे महात्मे राज्यालाही कसपटा- प्रमाणे तुन्छ समजत असतात. जळलेले बीज जशी अंकुरक्रिया करीत नाहीं त्याप्रमाणे या दनुपुत्राला या जन्मानतर मातेच्या उदरात वास्तव्य १ येथे टीकाकारानी — शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी' या भर्तहरीच्या नीति-शतकातील श्लोकाचा निर्देश केला आहे त्याचा सारांश असा-१ सूर्य-प्रकाशाने मलिन झालेला चंद्र, ९ जिचे तारुण्य नष्ट झाले आहे अशी मी, ३ कमलशून्य सरोवर, ४ सुंदर पुरुषाचे अक्षरशन्य मुख, ५ धनपरायण प्रभु, ६ सनत दारिद्य भोगणारा सज्जन, व ७ राजाच्या अंगण्यात असलेला खक ही सात माझ्या मनांतील घल्ये आहेत.