पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२४ बृहद्योगवासिष्ठसार. हुन निराळा आहे, अशी मी, पूजा होईतों, भावना करतो. तो गरुडावर बसला आहे. याच्या पाशी चार शक्ती स्फुरण पावत आहेत. त्याच्या हातांत शंख-चक्र गदा आहे. त्याचे शरीर श्यामवर्ण आहे. तो चतुर्भुज आहे. चंद्र व सूर्य हे त्याचे नेत्र आहेत. हा श्रीमान्, रम्य नदक-खजानें भूषित, पभहस्त, विशालनयन, शार्ङ्गधनुर्धारी, व महा तेजस्वी आहे. मी आता अगोदर सर्व परिवारासह मनोमय सामग्रीने याची पूजा करतो, नतर बहु- रत्नमय बाह्य सामग्री करीन. __ असा विचार करून प्रहादाने मनोमय सर्व सभार सज केला व मनानेच कमलाधव माधवाची पूजा केली. रत्नजडित पात्रानी त्याने त्याला अभिषेक केला. मानसिक चदनादिकाचे लेप लाविले. विचित्र धूप, दीप, नैवेद्य, वैभव, भूषणे, मदारमाला, सुवर्ण कमलें व इतर जातींची अनेक मुवासिक पुष्पें, दिव्य वृक्षाचे पल्लव, अकुर, सर्व सुदर पदार्थ, फळे, परिमल द्रव्ये, कर्पूरदीप, ताबुल इन्यादि सर्व कल्पित उपचारानी साग पूजा करून शेवटी त्याने त्या महेश्वराला आत्मसमर्पण केलें. ही मानस पूजा आटोपल्यावर प्रहादाने लोकसग्रहार्थ भव्य विष्णुमदिर बाधवून त्यांत श्यामसुंदर, चतुर्भुज लक्ष्मीनारायणाची स्थापना केली. सर्व प्रकारचे बाह्य उपचार जमविल व पूर्वोक्त क्रमानेच त्याची बाह्य पूजाही केली. वारंवार अशी पूजा केल्याने त्याच्या मनाला फार सतोष झाला. त्यानतर तो प्रति दिवशी तशाच परम भक्तीने त्या देवाधिदेवाची भांतर व बाह्य पूजा कर लागला. इतर जन श्रेष्ठाचे अनुकरण करितात, या न्यायाने त्या नगरातील सर्व दैन्यही त्या राजाचे हळु हळु अनुकरण करू लागले. थोडक्याच दिवसात ते सर्व देवशत्रु महावैष्णव बनले व त्यामुळे सर्वाचे कल्याण झाले. राजा भाचाराचे कारण आहे, म्हणून म्हणतात ते खोटे नव्हे. राघवा, ही शुभवाती स्वांत जाऊन जेव्हा पोचली, तेव्हा देवाना मोठा विस्मय वाटला. दैत्यानी विष्णुभक्तीचा अगीकार कसा केला, असे म्हणून विस्मयाकुल झालेले सर्व देव क्षीरसागरात सर्पशयनावर विश्राति घेत पडलेल्या हरीकडे गेले आणि तेथे हा दैत्यवृत्तांत सांगून ते म्हणाले,- " भगवन् , हे काय आश्चर्य आहे ? जे दैत्य सदा तुमच्या विरुद्ध मसा- वयाचे तेच आता तुमच्यामध्ये तादात्म्य पावले माहेत, हे काय ? यात काही तरी कपट असावे, असे वाटते, पर्वताचाही चूर करणारे अत्यंत दुर्पत