पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपक्षमप्रकरण-सर्ग ३१. कमल माझ्या हातात आहे. ही विचित्र अंगाने युक्त असलेली व त्यामुळेच सुमेरूच्या शिखरासारखी दैय-दानवनाशक, जड व सुंदर गदा माझ्या हातांत शळकत आहे. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या मालांनी दिक्तटांस लालट करणारे हे सुदर्शन-चक्र माझ्या या हातांत शोभत आहे. साक्षात् घूमयुक्त अनीप्रमाणे सुंदर, दीप्त, चकचकीत व दैत्यक्षांचा जणुं काय कुठारच असा हा नंदक-खड्ग मला आनंद देत माझ्या हातांत माहे. पुष्करावर्तक नांवाच्या कल्पातीच्या मेघांप्रमाणे शरधरावर्षाव करणारे हे माझे इद्रधनुष्यासारखे शाह धनुष्य आहे. ही मी आपल्या उद- रांत अनेक ( भूत-भविष्य-वर्तमान ) जगे सांठवीत आहे. ही पृथ्वी हेच माझे चरण, आकाशच शिर, त्रिभुवन शरीर व माझ्या कुशीच दिश माहेत. मी साक्षात् घनःशाम विष्णु आहे. गरुडपर्वतावर बसून मी शंख- चक्र-गदाधर झालो आहे. हे सर्व दुष्टचित्त पुरुष मजपासून दूर पळून जात आहेत. हा मी नीलकमलाप्रमाणे श्यामवर्ण, पीताबरधारी, गदाधर, लक्ष्मीवान् व गरुडारूढ स्वतः अच्युत आहे. क्षुब्ध कालाग्नीत पडणान्या पतंगाप्रमाणे आपल्या विनाशाकरिता माझा कोणता विरोधी त्रैलोक्य जाळ- ण्यास समर्थ असलेल्या माझ्यापुढे येणार आहे ! माझ्यापुढे असलेले हे सुरासुर माझ्या या दीप्त सृष्टीस प्रतिबध करू शकत नाहीत. मज ईश्वर. रूप विष्णूची ब्रह्मा, इंद्र, अग्नि, हर इत्यादि देव अनेक मुखांतून निघ- णान्या भनत वाणीने स्तुति करितात. हा मी ऐश्वर्यवान् व विष्णच्या आकाराचा झालो भाहे. मी सर्व द्वंद्वपदातीत व परम महिम्याने युक्त आहे. त्रिभुवनयुक्त असंख्य भुवने ज्याच्या जठरात आहेत, ज्याने सर्व दुष्ट प्राण्यांस मारले आहे व जे मेघ, पर्वत, तृण, अरण्य इत्यादि सर्वामध्ये माहे त्या सर्व भयाचा नाश करणान्या शरीरास मी प्रणाम करतो ११. सर्ग ३२-प्रन्हादाने केलेली विष्णूची मानस-पूजा व बायपूजा. दैत्यांची विष्णु- मकिप तें वर्तमान ऐकून विस्मित झालेल्या देवाचा हरीस प्रश्न. श्रीवसिष्ठ-राघवा, अशा मानस सकल्पाने प्रहादाने मापली तनु नारायणमय केली व पुनः त्या असुरा-शत्रूच्या पूजेकरितां बसा विचार चालविला- मी कल्पिलेल्या या विष्णूच्या शरीराहून निराळी, दुसरी कोणतीही सबष्ट अपवा व्यष्टि देवतारूप मूर्ति नाही. पण हाच मद्प विष्णु मास्या-