पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२२ बृहयोगवासिष्ठसार. देवांचा श्रीमान् गुरु आहे. दैत्यांच्या भुजदंडांचा जणुं काव पराध (कुन्हाडच) भशा त्याच्या वीर्यानें वीर्यवान् झालेला इंद्र भाम्हांस पाडतो. पुंडरीकाक्षापाशी शस्त्रास्त्रे जरी नसली तरी तो सदा दुर्जय आहे वाहूनही कठिण असलेला तो कोणत्याही शस्त्राने अथवा भस्त्राने विदीर्ण होण्या- सारखा नाही. आमच्या पितामहादिकांशी लढून त्याने पुष्कळ युद्धकौशल संपादन केले आहे, असे मला वाटते. त्या घोर प्रसंगीही ज्याला मय वाटले नाही तो आता माझाला भिईल याचे नाव कशाला हवें? त्याला वश करून घ्यावयाचे झाल्यास एकच उपाय मला सुचतो. या जगांत सर्व वस्तुस्वभाव, सर्व प्रकारच्या बुद्धी, व सर्व क्रियाविषयींचा उद्यम यान्या योगाने आश्रयाची इच्छा करणारास तोच एक शरण भाहे. दुसरी काहीं गति नाही. कारण या त्रिभुवनात न्यान्याहून अधिक वीर्यवान् कोणी नाही. प्रलय, स्थिति व सर्म याचे कारण तांच होऊन राहिला आहे. यास्तव मी आता या घटिकेपासून त्या अज नारायणास शरण जतो. मी नारायणमय आहे. 'नमो नारायणाय' हा सर्वार्थसाधक मंत्र माझ्या हृदयकोशातून, आकाशातील वायूप्रमाणे, कधीही जाणार नाही. हा हरिच दिशा, आकाश, पृथ्वी व सर्व जगत् आहे. मी अमेय भात्मा हरि छालो भाहे. मी विष्णुमय भआहे. जो स्वतः विष्णु न होतां विष्णूची पूजा करतो त्याला पूजाफल मिळत नाही. विष्णु होऊनच त्याचे पूजन केले पाहिजे. 'प्रन्हाद हरीच आहे, तो माझ्याहून पृथक नाही' असा आत निश्चय केल्यामुळे मी सर्वतः व्यापक झाली आहे. हा सुवर्णवर्ण पर अनत आकाशास व्यापून माझे भासन झाला आहे. त्याची सर्व शर्खे माझ्या हातात आहेत. मदारमाला व भूषणे यानी भूषित बाल माझे चार बाहू आहेत. क्षीरसागरातून निघालेली ही लक्ष्मी हात शुभ्र चामर घेऊन माझ्या बाजूला उभी आहे. सर्व जगाला स लुन्ध करणारी कीर्ति, सतत जगजाल निर्माण करणारी इद्रजालासखी माया वही लोक्यास जिंकणारी जया अशा या मजपाशी उभ्यात. नित्य शीत व नित्य उष्ण असणारे दे दोघे चद्र व सूर्य देव माझ्या नेत्र होऊन राहिले आहेत. माझ्या या शरीराची ही भेघश्याम दक्ष दिशांमध्ये पसरत भाहे. भयंकर अनि करणारा हा पांचजन्य माश्य हातात माहे. ब्रह्मदेवाच्या उत्पचीचे स्थान असे हे नामीपासून