Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ३१. दीन व दुःखी बाधव पूर्वीप्रमाणे शोभत नाहीत. त्यांचा मोठी दुर्दशा उडाली आहे. हाय हाय मत्त गजांसारख्या दैत्यांना सांप्रतकाली माझ्या पित्याच्या वेळच्या देवाप्रमाणे दीन करून सोडणान्या देवाला असाध्य काय आहे! थोडे कोठे पान हालले तरी ते शत्र आला असे समजून भितात. गांवात आलेल्या हरिणीप्रमाणे दानवस्त्रिया उद्विग्न होतात. त्यांचे सर्व दिव्य भोग नृसिंहाने नाहीसे केले आहेत. येथील कल्पवृक्ष शुष्क खाब होऊन उभे आहेत. नदनवनामध्ये मात्र त्याची लागवड मोठ्या त्वरेनें होत असून तेथे ते वाढतही आहेत. पूर्वी देवाच्या बदी करून आणलेल्या स्त्रियांची मुखें असुर प्रशसापूर्वक पहात असत व हल्ली असुराच्या बंदी करून नेलेल्या स्त्रियाची तोडे देव पहात आहेत. मला वाटते, की आतां देवाच्या हत्तींच्या गंडस्थळावरून, पर्वतावरील जलप्रवाहाप्रमाणे, मदप्रवाह वाहू लागले असतील व तीच आमन्या गजाची गडस्थ माळावरील काळ्या दगडाप्रमाणे कोरडी ठणठणीत झाली आहेत. ज्याच्या अगास शुभ्र मंदारपुष्पाचा सुवास येत आहे, असे मेरुशिखरासारखे दैत्य अलीकडे दृष्टी पडेनातसे झाले आहेत. दानवाच्या अंतःपुरात टेवण्यास योग्य असलेल्या देव-गधर्वस्त्रिया यावेळी झाडावरील मजिन्याप्रमाणे मेस्वर जाऊन राहिल्या आहेत. हाय हाय, देवस्त्रिया आमची विटंबना करण्या- करिता भामच्या विलासिनी स्त्रियाचे हावभाव, नाचण्याचे वेळी मुद्दाम करून दाखवितात. पूर्वी माझ्या पित्यावर जे चवऱ्या वारीत होते तेच आतां इंद्रावर वारीत आहेत. ज्याच्या पराक्रमाचे स्मरण करणेही दुःखद आहे त्या एकट्या हरीच्या प्रसादानेच त्याची अशी भरभराट झालेली भसून लामची हानि झाली आहे. त्याच्या अकृपेमुळेच आम्ही असल्या भयंकर आपत्तींत पडलो आहों. शिकारी लोकाच्या बरो- बरेच की जसे वानरास अडवितात त्याप्रमाणे शौरीच्या कृपेचा माश्रय करन रहाणारे हे देव आम्हाला आतां छळीत आहेत. त्यामळे प्रत्यही वेणीफणी करण्याचे वेळी असुरस्त्रियांच्या नेत्रात पाणी येते. अहाहा! या जगढ़ पी. जीर्ण मंडपाला त्या भगवानाच्याच भुजस्तंभाचा आधार आहे ! विपत्तिसगरात बुडणाऱ्या देवसैन्याला तोच तारतो. माझ्या बाबासारख्या दसन्याभिनेक महा वीर्यवान् राक्षसांना त्यानेच मारले व पढेही तोच मारीला तो अजिंक्य ईश्वरच या जगाचा संहार करणारा अमिक