पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. कल्पात करून सोडला. सर्वत्र हाहाकार उडाला व तेथील प्रत्येक जण भापापला जीव कसा तरी वाचवू लागला. असो; याप्रमाणे सर्व जगाला संताप देणा-या प्रन्हादाच्या पित्याला मारून नारायण कोठे भदृश्य झाला असता व देवादि सर्व सज्जन प्रसम होउन त्याच अधियज्ञाच्या सतोषाकरिता शास्त्रीय कर्मे करून त्यालाच समर्पण करू लागले असता तिकडे मरून राहिलेल्या दैत्यांचे पालन प्रन्हाद करूं लागला. ते सर्व जेथें हिरण्यकशिपु व इतर जन गतप्राण होऊन पडले होते तेथे आले व कालवशात् शुष्क झालेल्या सरोवरावर येऊन जलचरप्राणी जसा किलकिलाट करतात त्याप्रमाणे रडू लागले. प्रन्हादादि- कानी मृत बधूस उद्देशून मोठ्या दुःखाने आदैहिक कमें केली. व ज्याचे आप्त मेले अथवा जळून गेले आहेत अशा दुखी जनाना बोध करून सर्वोचें सात्वन केले. पण चितेमुळे निश्चेष्ट झालेले व त्यामुळेच चित्रात लिहिलेल्याप्रमाणे दिसणारे प्रन्हादादि सर्व दैत्य शोकाने अतिशय व्याकुळ झाले. वणव्याने जळलेल्या वृक्षाप्रमाणे त्याची स्थिति झाली ३०. सर्ग ११-प्रन्हादाने हरीच्या पराक्रमाविषया व वजनाच्या क्षेमाविषयी विचार कला आणि त्यांच्याच भक्तीने तो तद्रप झाला श्रीवसिष्ठ-नतर हे रामभद्रा, हरीने ज्यानील कर दानव मारून टाकले आहेत अशा पाताळात बसून व मौन धारण करून प्रसाद असा विचार करू लागला.-- भाह्मी माता कोणता बर उपाय करावा ? कारण ये जो जो मणन तीक्ष्ण अकुर उद्भवता त्याला त्याला वानराप्रमाणे हा हरि खाऊन सांडतो. हिमालयावर उद्भवलेल्या कमलाप्रमाणे या आमच्या पानाळांत उत्पन्न झालेले बाहुशाली दैत्य कधीही स्थिर रहात नाहीत. सागरावरील तरगाप्रमाणे ते भामुर आकाराचे दैन्य वारवार उत्पन्न होऊन नाश पावतात. अरेरे, मोठी खेदाची गोष्ट माहे, की आमचे शत्रु (देव) उन्कर्ष पावत असून सुहद् दुःख मोगीत आहेत. मृगराज नाहीसा झाला म्हणजे त्याचे अरण्य जसे सहस्रावधि क्षुद्र हरिणाच्या पायानी तुडविले जाते त्याप्रमाणे माझ्या पित्याच्या अभावी त्रिभुवन देवांच्या पराक्रमांनी व्यापून गेले आहे. पण पूर्वी तेच देव द्वेष- कलपित मनाने माझ्या बापाच्या पायर्यावर लोटांगणे घालीत होते. ज्यांची पाने जळून गेली आहेत अशा कमलांप्रमाणे माझे हे निरयोग, निस्तेज