पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण -सर्ग ३ सुखाच्या योगानें वृद्धि पावणे यांतील कांहीही तुला करावे लागणार नाही; तर तूं स्वस्थ ब्रह्म होशील २९. सर्ग ३०-हिण्यकशिपूचे वीर्य, प्रहादादि पुत्रांचा उद्भव, नृसिंहसत साचा वध, व प्रन्हादानें शोकाने केलेले त्याचें और्ध्वदेहिक श्रीवसिष्ठ-रामा, केवळ काकतालीय-न्यायाने प्रवृत्त झालेल्या व शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशाने अनुगृहीत असलेल्या स्वविचाराने ज्ञानोदय कसा होतो तें जनकादिकांच्या भाख्यानांनी सांगितलें. भाता उपासनेच्या योगानें ईश्वराचा अनुग्रह होऊन त्यामुळे उद्भवलेल्या विचारा- पासून ज्ञानोदय कसा होतो ते कळावें झणून दैत्येश्वर प्रन्हाद सिद्ध कसा झाला, ते सांगतों; ऐक. पातालगुहेमध्ये देवासुरास युद्धातून पळविणारा हिरण्यकशिपु म्हणून एक राक्षस होता. नारायणाच्या पराक्रमासारखा त्याचा पराक्रम असून त्याने इद्राचे आधिपत्य आपल्याकडे घेतले होते. देवादिकांचा पराभव करून त्या महाशूराने सर्व त्रिभुवनाचे राज्य केलें. त्रैलोक्येशतेचा अनुभव घेत असतांना, वसंतसमयीं वृक्षाना जसे अंकुर फुटतात त्याप्रमाणे त्याला योग्यसमयीं पुत्र झाले. ते क्रमाने वाढले. त्यांत प्रहाद या नांवाचा युवराज होता. रत्नांतील कौस्तुभाप्रमाणे दानवेश्वरपुत्रांतील त्या श्रेष्ठ प्रन्हा- दाच्या योगानें. सर्व सौंदर्ययुक्त वसताच्या योगाने जसा संवत्सर त्याप्रमाणे, हिरण्यकशिपु फार शोभत असे. पण ज्याला पुत्राचे चांगले सहाय आहे असा तो सैन्यकोशयुक्त दानवेश्वर हत्तीप्रमाणे मत्त झाला. त्याने त्रिभुवनास संताप दिला. त्याच्या प्रतापापुढे सूर्य-चद्र-प्रभृति देव निस्तेज झाले. एकाद्या दुर्वत्त पुत्राच्या वाईट कृत्यांनी त्याचे आप्तजन जसे कष्टी होतात त्याप्रमाणे देवार्षिगण खिन्न झाले व त्यांनी दैत्येंद्राचा वध करण्या- विषयीं भगवान् नारायणाची प्रार्थना केली. कारण महात्म्यांनाही वारंवार केलेला अपराध सहन होत नाही. देव व ऋषी यांच्या प्रार्थनेस मान देऊन भगवानाने भयंकर नारसिंह- रूप धारण केलें व त्या महा असुराला मारले. नंतर तो क्रुद्ध झालेला ईश्वर आपल्या नेत्रांच्या दीप्तीनेच सर्वोस जाळू लागला. तेव्हा त्या असु. राचे सहायकर्ते दैत्य भराभर पळून गेले. निस्तेज दिव्याप्रमाणे ते कोठे भाहेत हेही कोणाला कळले नाही. त्या ईश्वराच्या नेत्रामीने पाताळात