पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २९. ०१७ राघवा, बेलीची ही ज्ञानप्राप्ति मी तुला सांगितली आहे. त्याच्या दृष्टीचा आश्रय करून तंही जीवन्मुक्त हो. सतत आत्मविचार करून मी नित्य आहे, असा निश्चय कर. म्हणजे आत्मप्रयत्नानें तूं अद्वैत-पदास प्राप्त होशील. असुरश्रेष्ठ बलिही दहा कोटी वर्षे त्रिभुवनाचे राज्य करून शेवटी विरक्त झाला. यास्तव बा साधो, भोगभार दुःखपर्यवसायी आहे. असें जाणन त्याचा त्याग कर व दुःखरहित सत्य आनंदपदास जा. रामा या दृश्यदृष्टी नानाप्रकारचे विकार देणान्या आहेत. यास्तव दुरून डोंगर जरी साजरे दिसले तरी त्यांना जसे कोणी रम्य समजत नाहीत त्याप्रमाणे तू न्याना रम्य समजू नकोस. लोकवृत्तीमध्ये इतस्ततः धावणान्या व लोळणान्या चित्ताला आपल्या हृदयगुहेमर्थ्य बाधून स्थिर कर. चिन्मूर्य तूंच आहेस. तूं जगामध्ये सर्वत्र स्थित आहेस, मग तुला परका कोण व आपला कोण ! व्यर्थ का भुलतोस. हे महाबाहो, तूं अनत, आद्य व पुरुषोत्तम असून तूंच चिच्छरीरी शेकडों पदार्थाच्या आकाराने स्फुरण पावतोस. हे सर्व स्थावर-जंगम जग माळेच्या दायातील मण्याप्रमाणे शुद्ध बोधरूप अशा तुझ्या ठायीं ओतप्रोत माहे. तू उत्पन्न होत नाहीस व मरत नाहीम. तूं पुरुष, अज व नानाप्रकार जगपाने भासणारा आहेस. तू शुद्ध चित् आहेस तुला जन्म-मरणभ्राति न होवोत. तृष्णेची वृद्धि झाली असता जन्मादि सर्व रोगाचे प्राबल्य होते व तिचा क्षय झाला असता ते दुर्बल होतात, असें अन्वय-व्यतिरेकावरून जाणून तूं भोगांची तृष्णा सोड व भेगसाक्ष चिन्मात्र होऊन रहा. सदा उदय पावलेला तूं जगन्नाथ चित्सूर्य अस्तित्वात असल्यामुळेच हे सर्व ससारस्वप्नभूषण भासते. व्यर्थ विषाद करू नकोस. तूं सुख-दुःखशून्य सर्वात्मा, सर्वपदार्थावभासक व प्रबुद्धचित्त आहेस. कदाचित् मी प्रबुद्ध- चित्त नाही, असे जर तुला वाटत असेल तर त्याकरितां उपाय कसा करावा, तें सांगतों; ऐक. प्रथमतः तुझ्या मनाला जें जें इष्ट वाटत असेल तें तें अनिष्ट आहे असे समज व याच एका साधनाचा सातव्या भूमि- केचा परिपाक होईपर्यंत अभ्यास करून मनोजय झाला, की मग हे साध- नही टाक. इष्ट व अनिष्ट-घष्टि सोडली म्हणजे नित्य समता उदय पावते व ती हृदयांत स्थिर झाली की प्राणी पुनः जन्म घेत नाही. ज्या ज्या प्रदेशामध्ये मन बालकाप्रमाणे विधा होते. तेथून तेथून त्याला परतवून