पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्टसार लागला. देव, ब्रामण व गुरु यांची त्याने पूजा केली. मुत्, संबंधी, बांधव, सामंत व इतर सजन याचा सन्मान केला. भुत्यांस देणग्या व याचकांस दाने दिली माणि विचित्र वैभवाच्या योगाने उळनांची मने प्रसन्न केली. __ याप्रमाणे बलीचे राज्य वृद्धि पावले. त्याची आज्ञा देवादि सर्व शिरसा मान्य करूं लागले. काही दिवस या स्थितीत गेल्यावर त्या ज्ञानी दान- वेश्वराला यज्ञ करावा अशी इच्छा झाली. त्याप्रमाणे त्याने शुक्रादि मुख्य मंत्र्यांसह अश्वमेध केला. त्या यज्ञात सर्व भुवन तृप्त झाले. देव व ऋषी यानाही त्या यज्ञाची फार प्रशसा केली. पण हा बलि भोगार्थी नाही. मोक्षार्थी आहे, असा निर्णय करून त्याचे इष्ट करण्याकरिता सिद्धि देणारा माधव त्याच्या यज्ञात आला आणि केवल भोगांकरिता दीन झालेल्या व त्यामुळेच किंव करण्यास योग्य असलेल्या वडील इंद्राला जगजगलाचा तुकडा देण्याच्या उद्देशानें वलीला बाह्य दृष्टया फसवून पण अतर्दृष्टया त्याचे कोटकल्याण करून त्या पापहारक हरीने मायाबलाने तीन पावलानी तीन्हीं भुवनें त्याच्यापासून हिरावून घेतली व त्याला तळघरातील माकडा- प्रमाणे पाताळात बाचून ठेवलें. रामा, सांप्रतकाळी तो ध्यानात निमग्न होऊन जीवन्मुक्त स्थितीत म्वस्थ राहिला आहे. त्याचे प्रारब्ध त्याला इंदत्व देणार आहे. ह्मणून तो त्याकरिता अद्यापि शरीर धारण करून जीवन्मुक्ताच्या गतीचा अनुभव घेत आहे. तो महात्मा भापत्ति व सपत्ति याना समदृष्टीने पहातो. त्याची बुद्धि सुख-दुःखप्रसगी चित्रातील सूर्य- मंडलाप्रमाणे स्थिर रहाते. जीवनाविषयी आम्था ठेवणान्या भोगलंपट जीवाचे महस्रावधि उत्कर्ष व अपकर्ष दीर्घकाल पहात राहिल्यामुळे त्याचे मन भोगाविषयी अतिशय विरक्त झाले. असंख्य सुखदु.खाचे उत्पत्ति. विनाश, जीवाची चचल सपत्ति व अस्थिर विपत्ती याचा बलिराजाने दीर्घ काल अनुभव घेतला व त्यामुळे त्या विचारवानाला दहा कोटी वर्षे पाताळाचे राज्य केल्यावर पूर्ण विरक्ति माली. त्याचे मन शांत झालें. भोगाचा मिलाप सोडल्यामुळे बलीचे मन तृप्त झाले. तो आत्माराम होऊन सतत पाताल-गुहेत राहिला. त्रिमुवनाच्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याबद्दल त्याला मुळीच वाईट वाटले नाही. तो सर्व भाषांमध्ये सम व संतुष्ट चित्त झाला. जे कर्तव्य प्राप्त होईल तें स्वस्थ मनाने करावयाचे भशी त्याची शैली असल्यामुळे तो महात्मा स्वयंपानंद झाला.