पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २९. त्याच्याकडे आले व सभोवार उभे राहिले. प्रणाम करून उभ्या राहि- लेल्या त्यांच्याकडे पाहून तो पुनः मनात विचार करू लागला. जिचे सर्व संकल्प क्षीण झाले आहेत अशा चित्ला ग्राह्य काय आहे ! काही नाही. पण बाह्य अर्थ प्राह्य आहेत अशा कल्पनेने मन त्यांकडे पाहू लागले म्हणजे त्याच्या ठिकाणी आसक्तिरूप मल उद्भवतो. नुस्त्या पाह- ण्याने ते काही मालन होत नाही. तेव्हां मी समाधि लावून बसू की व्यवहार करू ? मोक्षाच्या इच्छेने समाधीचाच अवलंब केला पाहिजे म्हणून म्हणावे तर मला मुळी मोक्षाची इच्छाच नाही. जो बद्धच नाहीं तो मुक्त होण्याची इच्छा काय म्हणून करील ? कोणी बाधलेले नसतांनाही मोक्षाची इच्छा करणे हा शुद्ध बालिशपणा आहे. मला बंध नाही व मोक्षही नाही. माझी मूर्खता क्षीण झाली आहे. तेव्हा मला आता, मनाला विष- यासक्त होऊ न देता केवल साक्षिरूपाने जगाचा व्यवहार पहाण्यास कोणती हरकत आहे ! मी नुसत्या ध्यानामध्येच आसक्त का व्हावें ? मी पुरुष आहे. यास्तव आता यदृच्छेनें जें यावयाचे असेल ते येवो वजे जावयाचे असेल ते जावो. मला त्यामुळे हर्ष होणार नाही व शोकही होणार नाही. मला आता कशाचीही इच्छा राहिलेली नाही. मी सताप- शून्य झालो आहे. मला परतत्वाची वाछा नाही व जगत्स्थितीचीही भाकाक्षा नाही. मला ध्यानाशी काही करावयाचें नाहीं व वैभवाशी काही कर्तव्य नाही. मी मृत नाही व जीवंतही नाही. सत् नाही व असतही नाही. हे शरीर माझें नव्हे व त्याच्या पलीकडे असलेले विषयही माझे नव्हेत. मज ब्रह्मरूपाला नमस्कार असो. हे राज्य असो की नसो, मी मात्मस्वरूपांत शीतल असणार. मला ध्यानाला घेऊन काय करावयाचे आहे व राज्यवैभवाला तरी घेऊन काय करावयाचे आहे ? जे जसे असेल तसे असो. मला स्वतः जर काही करावयाचेंच नाही तर प्राप्त व अभ्यस्त कर्म करणान्या या शरीराला तरी मी काय म्हणून प्रतिबंध करावा ! मनाला त्याच्या मागोमाग जाऊन त्यांत भासक्त होऊ दिले नाही की, माझी काही एक हानि होणे शक्य नाही. भसा विचार करून ज्ञानानंदपूर्ण बलीने दैत्यांकडे पाहिले. वायु जसा पुष्पांचा सुगंध घेतो त्याप्रमाणे त्याने केवल दृष्टिपातानेच सर्व दैत्यांचे प्रणाम घेतले व तो पूर्वोक्त ध्येयपासनात्यागाने सर्व राजकार्य करू