पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. " दैत्यांनो, हा तुमचा स्वामी आपल्या विचारानेच सर्वाधिष्ठान ब्रमास प्राप्त झाला आहे. खरोखर ही फार मोठी गोष्ट आहे. हा भगवान् बलि आतां सिद्ध झाला आहे. यास्तव याला आतां येथे असाच राहू द्या. निर. तिशय मानदरूप आत्म्यामध्ये याला स्थित होऊ द्या. याला निरुपद्रव पद पाहूं था. फार दिवसांपासून भोग्य वस्तूचे संपादन करण्यात निमग्न झालेला हा श्रांत झाला आहे. यास्तव याला माता विश्रांति घेऊ द्या. याचा चित्तभ्रम क्षीण झाला आहे. याची संसारकलना शांत झाली आहे. यास्तव दानवांनो, भाता अगदी मुकाव्याने बसा. भज्ञान-संकटांतून सुटलेल्या याला आत्मलोक प्राप्त झाला आहे. यास्तव व्यर्थ कोलाहल करून तुझी यान्या आत्मसुखात विघ्न आणू नका. हा योग्यसमयी पापोभाप देहभानावर येईल. हा राजा एक महस्र वर्षांनी समाधि सोडून उठेल. तोपर्यंत श्रेष्ठ मंत्र्यानो, तुझी राजकार्ये सभाळा." __ गुरूचे हे आशाजनक भाषण ऐकून, वृक्ष जसे शुष्क मंजिन्यांचा त्याग करितात त्याप्रमाणे, मर्व दैन्यांनी राजाविषयींची शोकमय चिंता सोडली व ते सर्व पूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणेच एक मोटी सभा स्थापन करून आपा- पला व्यवहार आनंदाने करू लागले. मानव, सर्प, देव इत्यादि इतर जे तेथे आले होते ते सर्व भापापल्या स्थानी गेले २८. सर्ग २९-जीवन्मुक्त बलीची राज्यश्री, पाताळात अडकून रहाणे, रामाला वलीप्रमाणे होण्याचा उपदेश.. श्रीवसिष्ठ-राघवा, त्यानंतर दिव्य महम्र वर्षे झाली असता बलि समाधि सोडून उठला व त्यामुळे त्याच्या नगरात मोठा आनंद झाला. पण त्याचे मत्री त्याच्याकडे येत तो तो असा विचार करूं लागला.- __ अहो, या समाधीचे सुख किती अवर्णनीय आहे ! मी हा एक क्षण. भरच या स्थितीत होतो; पण त्या घोड्या कालांतही माझ्या विचाला केवढी विश्रांति मिळाली आहे म्हणन सांगू! या बाध विभूतींचा कितीही जरी उपभोग घेतला तरी त्यामुळे काय होणार ! या चितेकाम्यरूप उत्तम सिद्धीपासून मला जसा भातल्या भात संतोष होत आहे तसा चंद्रबिंबा- मध्ये जाऊन राहिल्यानेही होणे शक्य नाही. रामा, बलि मसा जो विचार करीत माहे तो त्याचे मंत्री इतर दैत्य