पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २८. १३ संकल्प शात झाले. सर्व वृत्ती लीन झाल्या. तो निःशंक व त्रिपुटीशून्य झाला. त्या निर्मलचित्त दैत्याच्या सर्व वासना शांत झाल्या. महापदास प्राप्त झालेला बलि वायुरहित प्रदेशांतील दिवसाच्या ज्योतीप्रमाणे निश्चल झाला. त्याचे चित्त अगदी शात झाले आणि तो महान्मा त्याच अव- स्थेत दगडावर खोदलेल्या चित्राप्रमाणे, त्या वातायनांतच फार दिवस राहिला. बलि इच्छा नसल्यामुळे परिपूर्ण, मननदोषरहित व निर्मल सत्तेने युक्त झाल्याकारणाने शरहतूतील स्वच्छ भाकाशाप्रमाणे शोभू लागला २७. सर्ग २८-बलीला निश्चेष्ट पाहुन दानव खिन्न झाले पण स्मरण करताच आले. ल्या शुकाने त्याच्या स्थितीचे वर्णन करून त्यांचा शोक घालविला. श्रीवसिष्ठ-नतर काही दिवसानी बलीचे अनुचर दानव आपला स्वागी एकटाच बसून वर काय करीत आहे, ते पहाण्याकरिता त्या रम्य मंदिराच्या माडीवर गेले. त्यात त्याचे डिभादि मत्री, कुमुदादिक सामत, सुरादिक राजे, वृत्तादिक सेनाध्यक्ष, हयग्रीवादिक सैनिक, चाकाजादिक बाधव, लडुकादिक मित्र, वल्लकादिक आप्त, कुबेर, यम, इद्र इत्यादि हातात भेटी घेऊन आलेले देव, या अधिराजाची सेवा करावयास मामाला अवकाश केव्हा मिळतो म्हणन वाट पहाणारे यक्ष, विद्याधर व नाग, चवन्या वारणान्या रंभा-तिलोत्तमादिक श्रेष्ठ स्त्रिया, सागर, नद्या, पर्वत, दिशा व उपदिशा यान्या देवता आणि त्रैलोक्यवासी दुसरेही अनेक सिद्ध तेथें न्या दानवराजापाशी आले. ते सर्व उचित कार्य करून त्याला प्रसन्न करण्याची इच्छा करीत होते. पण ध्यान व मौन याचा आश्रय करून चित्रात काढलेल्या पर्वताप्रमाणे निश्चेष्ट झालेल्या त्याला त्यांनी मोठ्या आदराने पाहिले. सर्वानी त्याला दुरूनच प्रणाम केला. पण दानव स्याची ती अपूर्व दशा पाहून खिन्न व विस्मित झाले. देवांना आनंद शाला व बलीचे आप्त भयभीत झाले. मत्र्यानी पुष्कळ विचार केला व सर्वज्ञांतील श्रेष्ठ भार्गवाचे स्मरण केले. त्याबरोबर त्याना कल्पित गर्व- नगराप्रमाणे शुक्राचें तेजःपुज शरीर दिसले. देव व असुर त्याची पूजा करूं लागले व त्यांच्या सत्काराचा स्वीकार करीत गुरु उचित आसनावर जाऊन बसला. त्याने ध्यान करीत, मौन धारण करून बसलेल्या दानवे- श्वरास पाहिले व क्षणभर विश्रांति घेतल्यावर बलिराजाच्या त्या निश्चेष्ट- तेचा चांगला विचार करून तो तेथील सर्व दानवांस हंसत म्हणाला