पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० बृहद्यागवासिष्ठसार. मार्गानेच वाहू द्यावे. बा शूरा, अशुभ मार्गात गेलेल्या मनास मोठ्या धैर्याने शुभ मार्गात आणावे. कारण, ते बालकाप्रमाणे आहे. बालकास एकीकडे डिवचले असता ते जसें दुसरीकडे जाते, त्याचप्रमाणे मनास एकीकडून चाळविले असता तें दुसरीकडे जाते. हा एक त्याचा चागला स्वभाव आहे. त्याच्यापासून लाभच करून घेतला पाहिजे. अशुभात गढून गेलेल्या मनास शुभाकडेच वळवावे. या चित्तबालकास हळु हळु चुचकारून वश करून घ्यावें. शुभवासनाचा समूहच दृढ करावा. मागच्या वासनाचा समूह शुभ होता की, अशुभ या विचारात फारसा काल घालवू नये. प्राणी ज्याचा अभ्यास करितो त्यातच तो प्रविण ोतो; हे तत्त्व विसरू नको. दृढ प्रयत्न कर. पच ज्ञानेद्रियांस जिक. हीच महा दुष्ट आहेत, कमेंद्रिये बिचारी निरुपद्रवी व परतत्र असतात. त्यास प्रेरणा करणाऱ्या मनास भलभलत्या नादी लावणारी ही ज्ञानेद्रियेच मोठी घातकी आहेत. तत्त्वाचा साक्षात्कार होईपर्यंत तू गुरूचे व शास्त्राचे वचन हेच परम प्रमाण आहे, असे समजून या शुभ वासनाचा अभ्यास कर. पुढे तत्त्वसाक्षात्कार होऊन तुझ्या चित्तावरील वासनामल नाहीसा झाला की, मग तूं या शुभ वासनाचाही त्याग कर. याप्रमाणे चालल्यास कोणाचेही परम कल्याण झाल्यावाचून रहाणार नाही ९. सर्ग १०-या सर्गात, वसिष्ठ मुनि-धात्याचा व आपला जन्म, समस्त जनाच्या ____ मुक्तीकरिता त्याने आपणास केलेला उपदेश-इत्यादिकाचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, सच्चिदानद-स्वप्रकाशरूपाने पर-ब्रह्मच सर्वत्र सम व सर्वानुकूल होऊन राहिले आहे. त्याच्यायोगानेच कालादि सर्व पदार्थ सत्ता( अस्तित्व )वान् झाले आहेत. अर्थात् काल, नियति, भवितव्यता इत्यादि सर्व त्या सत्तेचेच प्रकार आहेत. तेव्हा भवितव्यतेमुळे ह्मणजे भविष्यत्काली अवश्य होणाऱ्या गोष्टींमुळे तरी, पुरुष परतंत्र होऊन राहील हे झणणे व्यर्थ आहे. कारण व कार्य यामध्ये अनुक्रमे नियामक व नियम्य अशी जी दोन प्रकारची शक्ति आहे. ती या ब्रह्मसत्तेहून भिन्न नाही. यास्तव, कारण असले की, कार्याने अवश्य निर्माण होणे व कार्य असले की, कारणाने त्यापूर्वीच अवश्य असणे ही नियति ( नियम ) ईश्वर व प्रयत्न याच्यावर सर्व भार टाकून रहाणाऱ्या पुरुषास काही करू शकत नाही. उलट, ती त्यास अनुकूल होते.