पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१२ बृहयोगवासिष्ठसार. प्रकाशित न केले तर ती असली काय व नसली काय सारखीच. तात्पर्य दिशा, पर्वत, जगत, भाकाश, इत्यादि सर्व चित्प्रकाशानेप्रकाशित होते. या दगडा सारख्या शरीरास चैतन्याने सचेतन न केल्यास त्याला शरीर कोण ह्मणणार ! साराश इद्रिये, मन, इच्छा, प्रयत्न, इत्यादि सर्व चित्. या परमात्म- रूप चिच्छक्तीनेच मी बोलतों, चालतो, पहातो, स्पर्श करतो व दृश्य पदार्थाचा भोग घेतो. नुस्त्या शरीराने, इद्रियानी अथवा मनाने मी काही करीत नाही. लाकूड अथवा पाषाण यासारख्या या शरीराने मी काय करूं शकणार ? सर्व जगाचा चेतनात्मक आत्मा मी आहे. मी चित्च आका- शात, सूर्यादि तेजात, वायु, जल व पृथ्वी या तीन भूतांत, देव, असर इत्यादिकाच्या देहात व चराचर पदार्थात आहे. चित्-वाचून येथें दुसरी कल्पनाच नाही. द्वित्वाचाच असंभव झाल्यावर शत्रु कोण व मित्र कोटचा ? या बलिनामक शरीराचे भामुर मस्तक जरी तोडलें तरी त्यात सर्व लोकास व्यापून राहणाऱ्या मज चित्ची कोणती हानि आहे ! चित्नें ज्याला चंतित केले आहे असा द्वेषच द्वेष होतो, न्यावाचून तो होत नाही. याम्नव द्वेपादि सर्व भाव व अभाव चिदात्मक आहेत. या विस्तीर्ण त्रिभुवनोदरात कितीही विचार केला तरी चित्-वाचून दुसरे काही आढळत नाही. वस्तुनः द्वेष नाही, राग नाही, मन नाही, त्याच्या वृत्ती नाहीत. कारण अतिशुद्ध चेतन्याचे ठायीं या विकल्पकलना काटन्या असणार? सर्वग, व्यापी व निन्यानदमयान्मक चित् मी आहे. मजमध्ये द्वितीयाश नाही. जगाचे रूप व नाम याचे अधिष्टान अशा या चित्रचे चित हे नावमुद्धा काशित आहे. मी कोण ८ या प्रश्नाचे उत्तरही माझे मलाच मिळाले आहे. दृश्य- दर्शनरहित केवल शुद्धस्वरूपी, निन्यादिन, निरामास व द्रष्टा परमेश्वर मी भाहे. मजमध्ये स्फुरण पावणारे हे सर्व दृश्य आरशांतील मुखाप्रमाणे मिथ्या आहे. माझ्या प्रत्यक्चेतन स्वरूपास नमस्कार असो. मी भाकाशाइन मोठा व अणुहुन अणु आहे. सर्व मी आहे. त्यामुळे कोणी कोणाला काही दिलें अथवा घेतलें, कोणी कोणाला मारले अथवा सुख दिले, कोणी कोणाशी द्वेष केला अथवा प्रेम ठेवले तरी ते सर्व माझे माझ्याशीच होत असल्यामुळे मला क्षुब्ध होण्याचे मुळीच कारण नाही. राघवा, परम तत्त्वज्ञ बलि असा विचार करीत. बोकाराच्या अर्धमात्रेचा अर्थ अशा तुरीय आत्म्याचे ध्यान करीत मौन धरून बसला. त्याचे सर्वे