पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १७. ७११ इत्यादि जीव म्हणजे काय गौडबगाल आहे ! व या भोग्य वस्तूंचे तत्व काय आहे, ते मला सत्त्वर सांगा. श्रीशुक्र-दानवेंद्रा, उगिच अधिक सांगत बसण्यांत काही अर्थ नाही. शिवाय मला आकाशात जावयाचे आहे. यास्तव तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी संक्षेपतः देता ते ऐक. या जगांत चित् माहे. या दृश्यान्या उत्कर्षाचा अवधि चित् आहे. हे सर्व चिन्मय आहे. तूं, मी इत्यादि सर्व मोक्तृ-वर्ग चित्रच आहे व हे सर्व भोग्यजातही चित्च आहे. राजन्, मी सांगितलेल्या या सक्षिप्त तत्त्वबोधावर पूर्ण श्रद्धा ठेवून तू जर विवेक केलास तर खचित या अल्प उपदेशापासूनच तुला सर्व प्राप्त होईल. पण श्रद्धा व विवेक यांच्या अभावी तुला कितीही जरी सांगितले तरी तें सर्व राखेंत टाकलेल्या आहुतीप्रमाणे व्यर्थ होणार आहे. चित्-तत्त्वाने विषयाकार होणे हाच बंध व त्या आगंतुक भाकारापासून मुक्त होणे हाच मोक्ष होय. कारण विषयाकाररहित चित् म्हणजे पूर्णात्माच होय, अशा निश्चयाने जर पहाशील तर आपोआप तुला आत्मसाक्षात्कार होईल. असो; देत्या, आता मी देवलोकास जातो. कारण तेथें सात मुनी काहीं देवकार्याकरिता जमले आहेत. तेव्हां मलाही तेथें अवश्य गेले पाहिजे. कारण हे राजन्, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत मुक्तबुद्धि पुरुषानाही स्वभावतः प्राप्त होणान्या क्रियांचा त्याग करणे शोभत नाही. रामा, असें बोलून भार्गव प्रहगणांनी सुशोभित झालेल्या अतरिक्षांत उडून गेला. २६. सर्ग २७-शुक्राने सांगितलेल्या मार्गाने विचार करितांच बलीला ज्ञान झाले व चिपूर्णानंद-विश्रांति घेत तो दीर्घ काल राहिला. श्रीवसिष्ठ-देव व दानव यांच्या सभेत श्रेष्ठ मानला गेलेला भृगुपुत्र गेला असता बुद्धिमानांतील श्रेष्ठ बलि मनाने असा विचार करूं लागला- पूज्य शुक्राचार्यांनी सांगितलें तें अगदी योग्य माहे. हे जगत्रय चित्च भाहे. मी चित, हे लोक चित् व क्रिया चित् होय. हे सर्व सबाह्याभ्य- तर परमार्थतः चित्च आहे. त्यावाचून येथे कोठेही काही नाही. 'हा सूर्य' अशा रीतीने चित्- सूर्याला प्रकाशित न केल्यास सूर्य व अंधकार यांचा भेद कसा व्यक्त होणार ! कारण सूर्याच्या झानाभावीं तोही अंधकारा- -सारखाच असतो. 'ही भूमि' अशा रीतीने भात्मप्रकामाने भूमीला जर