पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्ठसार. भोगले. चंचल तृष्णेच्या नादी लागून मी मझाने आपल्याच पश्चातापा- करितां या त्रिभुवनांत काय काय केले नाही! पण आतां ही तुच्छ पूर्व चिंता जाऊ दे. सांप्रतकाली विद्यमान असलेल्या मोहाची चिकित्सा करून मी माता भगोदर या पुरुष-जन्माचें साफल्य कोणत्या उपायाने होईल त्याचा विचार करतो. अपरिच्छिन ब्रह्मरूप झाल्यामुळे मला पूर्णानंद कसा प्राप्त होईल ? याविषयी माता मी आपल्या शुक्राचार्योना तरी विचारितो. मी कोण व आत्मा कोण, याचा निर्णय होण्याकरिता त्या गुरूंनाच प्रश्न करावा, हे बरे. त्यावाचून माझ्या अज्ञानाची शांति होणार नाही. ते माझे नाथ मला आत्मदर्शनोपाय सांगतील. भातां मजवर प्रसाद करण्यास सदा उद्यत असलेल्या त्याच परमेश्वररूप आचार्याचे मी स्मरण करितों व त्या मात्मज्ञानी मला आत्मोपदेश केला म्हणजे मी स्वतः आत्मरूप होऊन राहीन. कारण महात्म्याचा उपदेश निष्फळ कधीही होत नाही २५. सर्ग २६-स्मरण करितांच भालेल्या शुक्राचार्यानी बलीस तत्त्वसारोपदेश करून स्वर्गलोकीं गमन केले. श्रीवसिष्ठ-रामा, असा विचार करून बलवान् बलीने डोळे झाकून ब्रह्माकाश हेच ज्याचे विश्रांतिस्थान आहे अशा कमलनयन शुक्राचे स्मरण केलें. तेव्हा सतत ध्यानपरायण झालेला भार्गव, ब्रह्मरूप झालेला अस- ल्यामुळे, गुरूच्या सहायाची इच्छा करणाऱ्या बलीने आपले स्मरण केलें आहे, असें तत्काल जाणून त्याच्या पूर्वोक्त वातायनात आला. त्या सर्वगत अनत चिदात्म्याने आपल्या शरीराला तेथे आणले. सूर्यप्रभेचा स्पर्श होताच कमल जसें विकास पावते त्याप्रमाणे गुरूच्या देहप्रभेचा स्पर्श शरीरास होतांच बलि देहभानावर भाला. गुरुमूर्तीला समोर पहातांच त्या भक्तिमान शिष्याने रग्नें व मंदार पुष्पें यानी युक्त असलेलें मर्य देऊन पादवंदन केलें. आचार्यानीही हस्त पादप्रक्षालन व आचमन करून, मूल्यवान् आसनावर बसून, थोडीशी विश्रांति घेतली. नतर- बलि-प्रभो, सूर्यप्रभा प्राण्यांना आपल्या उचित कार्यात जशी प्रवृत्त करिते त्याप्रमाणे तुमच्या प्रसादाने उत्पन्न झालेली प्रतिभा मला मनातील भाशय बोलून दाखविण्याविषयी प्रेरणा करीत आहे. महामोहात पाडणान्या भोगांविषयी मी विरक्त झालो आहे. यास्तव गुरुवर्य, या भोगांच्या उत्क- पोचा अवधि कोठवर माहे ? त्यांचा स्वभाव काय आहे ! मी, भापण