पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २१ परम अतिशय आवश्यक आहे. त्यावाचून अत्यंत पावन आत्म्यामध्ये विश्राति घेता येत नाही. ते नित्य सुख जर तुला लवकर हवे असेल तर विषयविरक्ति आताच संपादन कर. म्हणजे विचाराच्या योगाने तूं परम पदी पोंचशील आणि पुनः दुःख भोगण्याकरिता कल्पनारूपी चिखलांत रुतणार नाहीस. अशा अवस्थेस पोंचला तूं मलाही वंद्य होशील. कारण ब्रह्मज्ञ स्वय ब्रह्म होतो असें वेदवाक्य आहे २४. सर्ग २५-बलीचा विचार व त्याने केलेलें शुक्राचार्याचे स्मरण. पालि-महा विचारी पित्याने मला मागें सागितलेले हे सर्व या वेळी मला आठवलें ही मोठी भानदाची गोष्ट आहे. त्या वेळी माझ्या मनात विषय वैराग्य बाणले नव्हते; पण आता ते आपोआप आले आहे. यास्तव त्याच्या सागण्याप्रमाणे मी आता अमृतासारख्या शीतळ व स्वच्छ शम- मुखांत प्रवेश करतो. पुनः पुन आशा पूर्ण करून घेत असताना पुनः पुनः धन मिळविताना व पुन पुन कातेचे मनोरंजन करीत अस- तांना मला फार कष्ट होतात. खरोखर ही शातिभूमि फार रम्प आहे. तिचा अतर्भाग फार शीतळ आहे. शातिभूमीमध्ये सर्व मुख-दुखदृष्टी नाश पावतात. यास्तव मी आता शात होतो; चद्रबिंबामध्ये टाकल्या. प्रमाणे अतिशय आनंद भोगतों व सम भावामध्ये स्थित होऊन सुखाने रहातो. हर हर! वैभव सादन करण्यात केवढे दुख आहे ! एकसारखा क्षोभ कसा होत असतो! मागे मी स्त्रियाच्या मासप्रधान शरीराच्या स्पशोने किती आनदित होत असे? पण तो शुद्ध मोहविलास आहे. मी आजवर नाना प्रकारच्या वैभवाचा अनुभव घेतला. विविध भोग भोगले सर्व भूताचे आक्रमण केले. पण त्यात खरें मुदर असे काही आढळले नाही. पुनः तेच ते चर्वितचर्वण. स्वर्गात जा की भूलोकी या, अपूर्व काही नाही. यास्तव मी आता या सर्व बाह्य कल्पनाना सोडून स्वस्थ होता. पूर्णाहूनही पूर्ण होऊन रहातो. त्रिभुवनात स्त्रिया, रत्ने, इत्यादि जें जें ह्मणून आज सारभूत असल्यासारखे वाटते तेच उद्या असार होते. तुच्छ जगाच्या लोभाने मी देवाशी व्यर्थ द्वेष केला. खरोखर तो माझा बालिश- पणाच आहे. केवल मनाने निर्मिलेल्या या जगत्-नामक महा-आधीने सर्वाना जर्जर केले आहे. यास्तव महात्मे त्याच्यावर प्रेम कसे करणार! हाय हाय इतके दिवस मी मूढाने मनालाच स्वार्थ समजून व्यर्थ केश