पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७०७ ५ उपशमप्रकरण-सर्ग २४ संपादन करावी. अव्युत्पन्न चित्ताला सन्मार्गामध्ये अथवा शास्त्रीय क्रमा- मध्ये प्रवृत्त करावयाचे झाल्यास हळु हळुच केले पाहिजे. प्रथम त्याला देहोपयोगी अन्न-वस्त्रादि विषय संपादन करावयास दिवसाचे दोन भाग देऊन तिसऱ्या भागांत शास्त्रावलोकन व चवथ्यात गुरुशुश्रूषा करावयास लावावे. काही दिवसांनी त्याला बरेचसे शुभ संस्कार झाले म्हणजे दिव- साचा एकभाग देहयात्रेकरितां, दोन भाग गुरूंशी सहवास करावयाकरिता व एक भाग शास्त्रावलोकनाकरिता द्यावा. गुरूच्या अमृततुल्य उपदेशाने चित्त चागले व्युत्पन्न झाले म्हणजे त्या चित्ताला वैराग्य व विचार याच अभ्यास करावयास अर्धाकाल देऊन बाकीच्या वेळी ध्यान व गुरुपूजा यांमध्ये त्याला निमग्न करावे. पण या चारी क्रमामध्ये साधुत्वास प्राप्त झालेला (म्हणजे ज्याचे चित्त स्वच्छ आहे असा) जीवच अधिकारी आहे. कारण धुवून स्वच्छ केलेल्या वस्त्रावरच रंग चागला बसतो. त मग किचित् मलिन असलेल्या चित्ताला कसे व्युत्पन्न करावें म्हणून विचारशील तर सांगतो. त्या चित्तबालकाला दुःखाचा अन्वय व व्यति रेक दाखविणे (म्हणजे विषयासक्त झाल्यास हे पहा असें दुःख होतें । न झाल्याने हे पहा सुख होते इत्यादि उदाहरणे देऊन सांगणे) ही युत्ति वेद, स्मृति, इतिहास इत्यादि उत्तम उक्ती व शास्त्रपीरशीलन याच्या योगा हळु हळु लाडवावें. म्हणजे काही दिवसानीं तें चित्त शुद्ध होऊन प ज्ञानामध्ये परिणत होते. बाह्य आकार ग्रहण करणे हा त्याचा आग्रह निघू. जातो आणि ज्याच्यावर चांदणे पडलें आहे अशा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ व शीत होते. भेदवैषम्य, कौटिल्य इत्यादि दोषानी रहित व भोग ईश्वर, जीव, देह व इंद्रियादि या सर्वांचे अधिष्ठान, आनंदाद्वय, ब्रह्मस्वरू ब्रह्माकार प्रज्ञेने पहावें. प्रज्ञा व विचार यांच्या योगाने आत्मज्ञान व तृष्ण त्याग यांना एकाच वेळी संपादन करावें, परमात्म्याचे दर्शन झाले म्हण वैराग्य पूर्ण बाणते व तृष्णेचा अभाव झाला म्हणजे परमात्मदर्शन हो म्हणजे ती दोन्ही परस्परांच्या आधाराने रहातात. विषयभोगांचा स्व कमी झाला व परात्पर देवाचे दर्शन झाले म्हणजे परब्रह्मामध्ये अनत शाश्वत विश्राति उदय पाक्ते. विषय हेच या जगांतील सार आहे त्यांतच आनंद आहे, असें जाणून त्यांचाच स्वाद घेणाऱ्या जीवांना नि तिशय आनंद कधी प्राप्त होत नाही. यज्ञ, दान, तप, तीर्थसे