पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्ठसार, आपल्या नियति-प्रयुक्त शुभाशुभ क्रिकेलाच मानुषष्टि पुरुष दैव म्हण- तात. दिव्य व शास्त्रीयदृष्टी पुरुष म्हणत नाहीत. पण त्या नियतिरूप दैवाला पुरुष-यत्नाने जिंकता येते. यत्नाने जसा जसा संकल्प करावा तसे तसें सर्व होते. हीसुद्धा एक नियतिच भाहे. भामच्या मती जीव मनच आहे. यास्तव तो जशी कल्पना करतो तसे होते. चित्त नियत पदार्थीस अनियत करतें व अनियत वस्तूंस नियत करते. यास्तव चित्त नियतिनियोजक आहे. स्वसंकल्पाप्रमाणे तें फल-नियतीही उपपादक आहे आणि असा नियम असल्यामुळेच, मोक्ष-योग्य जन्मामध्ये हा चित्तात्मा जीव केवल परमार्थविषयक साक्षात्कार-नामक निर्विकल्पसमाधि- रूप नियति करीत या ब्रह्मांडामध्ये, माकाशांतील वायूप्रमाणे, स्वरूपानें प्रकाशित होऊ लागतो (म्हणजे मी आनंदात्मा माहे, अशा भावनेने तो स्वतः आनंदरूप होतो ). व्युत्थानसमयीं तोच शास्त्ररूप नियतीने नेमलेले लाश्रमोचित कर्म अज्ञ जनाच्या ज्ञानाकरितां करीत असतांना शिष्ट, सदाचारप्रवर्तक इत्यादि सन्मानयुक्त नावांनी प्रख्यात होतो. यास्तव मन असेपर्यंत नियति नाही व दैवही नाही आणि त्याचा अस्त झाला की, हे साधो, जे जसें राहील ते तसेंच असू दे. जीव, कर्म व ज्ञान यांच्या संपादनास योग्य असलेल्या मानुषादि शरीरास प्राप्त होऊन जसा संकल्प करितो तसे सर्व होते. या जगात पुरुषार्थावाचून काही नाही. यास्तक दृढ पुरुषार्थाचा आश्रय करून भोगाविषयी विरक्त व्हावे. संसाराचा नाश करणारी भोगांची भरति जोपर्यंत उत्पन्न झालेली नसते तोपर्यत जय देणारी परा शाति प्राप्त होत नाही. भोगरति असेपर्यंत दुःखद भवदशा संपत नाहीत. यास्तव पुत्रा, परमार्थ चिंतन करावें. वैराग्यादिकांचा सतत अभ्यास केल्यास सर्व दुःखाचा नाश होणे, अगदी साहजिक आहे. बलि-प्रभो, नित्य आत्मभाव देणारी जीवाची भोगविरक्ती स्थिर कशी होईल? विरोचन---ज्याप्रमाणे द्राक्षादि महालता अनुकूल काल माला असता फळांनी भरून जाते त्याप्रमाणे मोक्षफल देणारी भात्मदर्शन-लता पेराम्य- नांवाचे भवतिर फळ देते. भात्म-ज्ञानाने तीन वैराग्य हृदयांत स्थित होते. यास्तव प्रज्ञारत्नाला घांसन स्वच्छ करण्याची जणू काय साणच अशा विचाराच्या योगाने त्या देवाचे दर्शन घ्यावे व त्याच वेळी विषयविरक्तिही