पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २१. यास्तव माझ्या प्रिय पुत्रा, राजदर्शनाचा व मत्र्याच्या पराभवाचा उपाय एकदम भारंभावा. आपला प्रयत्न व हळु हळु केलेला अभ्यास यांच्या योगाने त्या दोघांचे संपादन केलेंस झणजे तुला तो विस्तीर्ण प्रदेश प्राप्त होईल. तुझा अभ्यास ज्ञानरूपानें परिणत झाला ह्मणजे तुं निःशोक प्रदे- शास जाऊन पोचशील. ज्यांचे सर्व आयास क्षीण झाले आहेत, ज्यांचे चित्त सदा आनंदित आहे व ज्याचे सर्व संशय शात झाले आहेत, असे साधू न्या प्रदेशात रहातात. पत्रा, आता तो देश कोणता ते मर्व मी तुला सागतो. बाळा, त्या देशाचे नाव मोक्ष अमें आहे. त्यात दुःखाचा गंधही नमतो. तेथील राजा सर्वपदातीत आत्मा. त्याने मनाला मंत्री केलें आहे. मातीचा गोळा जसा घट होतो अथवा धृर मेघरूप बनतो त्याप्रमाणे मनामध्ये पासनात्मक सूक्ष्म भावानें स्थित असलेले हे जग स्थूलतेम प्राप्त झाले आहे. त्याला जिंकलें असता सर्व जिंकल्यासारग्वे व सर्व मिळविल्यासारखे होते. पण ते दुर्जय आहे. यास्तव न्याला युक्तीनेच जिंकावे लागते. बलि-बाबा, चित्ताला जिंकण्याची जी उत्तम युक्ति अमेल तीच अगोदरे मला सागा, म्हणजे मी त्या दारुण मंत्र्याला जिंकून सोडतो. विरोचन-बा पुत्रा, सर्व विषयाविषयी सर्वथा अनास्था हीच मनो- जयाची उत्तम युक्ती आहे, याच उकृष्ट उपायाने स्वमनोम्सी महामत्त हत्तीचे दमन करिता येते. अभ्यासावाचून ही युक्ति अन्यत दुष्प्राप असून चांगल्या अभ्यासाने ती सुलभ होते. क्रमाने अभ्यास करूं लागले असता ही विषयाविषयींची अरति, रोज पाणि घालीत असलेल्या वेलीप्रमाणे, शांत्यादिकाच्या योगाने चांगली पोसते. पेरल्यावाचून जसे धान्य मिळत नाही त्याप्रमाणे अभ्यासावाचून नुस्त्या इच्छेने ही मिळत नाही. ससाररूपी खळग्यांत लोळत पडलेले हे सर्व जीव विषयाविषयी विरक्त झाले नाहीत, तोच दुःख भोगतात. अति बलाढ्य पुरुषालाही चालून गेल्यावाचून जसे दुसन्या गांवास पोचता येत नाही त्याप्रमाणे अभ्यासावाचून विषयविरक्ति कधीही प्राप्त होत नाही. ध्येयत्यागाचे सतत ध्यान करणान्या पुरुषानें अभ्यासाने तिला वाढवावे, पुरुष-प्रयत्नावाचून हर्ष-क्रोधरहित क्रियाफळ प्राप्त करून घेण्यास अनुकूल असलेले साधन मिळत नाही. दैवानेच ते मिळेल म्हणून म्हणावे तर देव देहासारखें प्रत्यक्ष दिसत सहरी कारण