पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग २३. बल, अमि, दिशा, अर्धभाग, अधोभाग, स्वर्ग, पाताळ, मी विरोचन, हरि, हर, इंद्र, इत्यादि कोणी नाही. त्यांत एकच फार मोठा राजा (आत्मा) आहे. तो सर्वग, सर्वकृत् , सर्व व निर्विकार आहे. त्याने सर्व उत्तम मंत्र्यांतील श्रेष्ठ असा एक मंत्री (मन) कल्पिला आहे. तो अत्यत अघटित असलेलेही कर्म (मात्म्याचे संसारित्व) करितो व सुघटित कार्यही (पूर्णानंदत्व) पार नाहीसे करून सोडतो. तो स्वतः कशाया भोग घेऊ शकत नाही व काही जाणत नाही. पण तो असा अज्ञ असूनही राजासाठी सर्व करतो. त्या राजाचा तोच सर्व-कार्यकर्ता आहे. स्वतः राजा केवल एकांतांत स्वस्थ रहातो. बलि-बाबा, आधि-व्याधिरहित असा तो कोणता देश आहे ! तो कसा प्राप्त होतो? प्रभो, आजपर्यंत त्याला कोणी संपादन केले आहे का? तो विलक्षण मंत्री कोण आहे ? त्या महाबल राजाचे नाव काय ? व सहज लीलेने जगज्जालांस भापलेसे करणाऱ्या भामच्याकडूनही पराभूत न झालेला तो कोठे आहे ! देवास भय देणान्या पित्या, मला है अद्भुत माख्यान स्पष्ट करून साग व माझ्या हृदयाकाशांतील संशय घालीव. विरोचन-बाळा, लक्षावधि देव व भसुर मिळूनही त्या महाबलाढ्य मंत्र्यास जिंकू शकत नाहीत. तो इंद्र नव्हे, यम नव्हे, देव नव्हे व असुरही नव्हे. तेव्हा त्याला कसे जिंकता येणार ! पाषाणावर कमलांचे प्रहार जसे काही परिणाम करू शकत नाहीत त्याप्रमाणे त्याच्यावर खग, मुसल प्रास, वन, चक्र, गदा इत्यादि शस्त्रे व भत्रे कुंठित होतात. ती अस्त्रा. दिकांचा व शूराच्या शौर्याचा विषयच होत नाहीत. उलट त्यानेच सर्व देवासुरांस सदा आपल्या वश करून घेतले आहे. विष्णु नसलेल्याही त्याने हिरण्याक्षादिक असुरांस पराभूत करून कल्पपात जसा मेरूवरील कला- वृक्षांस पाडवितो त्याप्रमाणे, भूमीवर लोळविलें. सर्वज्ञ नारायणादिक देवा- नाही त्याने यथेच्छ स्ववश करून घेऊन गर्भ-छिद्रात कोंबले. त्या मंत्र्याच्या प्रसादाने ज्याच्या जवळ केवळ पाचच बाण माहेत असा मदन सर्व त्रिभुवनाचे भाक्रमण करून मोठी प्रौटि मिरवतो. देव व असुर ज्याच्या योगानें स्वैर वर्तन करू शकत नाहीत तो निर्गुण, दुर्मति व दुरा- कृति क्रोधही त्या मंत्र्याच्या प्रसादानेच वृद्धि पावतो. सहस्त्रावधि देषा- सुरांचा जो हा वारंवार रोमहर्षण संग्राम होत असतो तो या मंत्रशासन