Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्स ९. ६९ श्रीवसिष्ठाचा' हा अमृततुल्प, उपदेश ऐकून रामचद्र पुनः, ह्मणलो- भगवन्, प्राक्तन वासनासमूह मला जंशी प्रेरणाकरितो . तने मी वर्दन करितो... मज..कृपणाच्या हातून अधिक काय होणार? यावर भगवान् वसिष्ठ ह्मणतात बरे आहे; प्रातम कर्माच्या अधीन , असणान्या तुला पूर्व प्रयत्नाच्या. फलात जरी बदल 1 पाडता न आला, तरी उत्तर काली . जे पाळ तुला मिळवावयाचे आहे तदनुकूल व्यापारः करण्यास तू स्वतंत्र आहेस हाणजे त्याच्याकरिता योग्य प्रयत्न करिता येणे शक्य आहे शिवाय, तुला जो हा सविने युक्त असा जन्म प्राप्त झाला आहे, त्यावरूनच तुझ्या पूर्वीच्या सत्-प्रयत्नाचें अनुमान होते. तेव्हा प्राक्तन तुझ्या प्रयत्नाच्या आड येईल, अशी भीति बाळगणे व्यर्थ आहे. कारण, प्राक्तन वासनाचा समूह शुभ व अशुभ असा दोन प्रकारचा असतो. त्यातील शुभ वासनाच्या ओघातून जो । जात असतो त्याला शुभाचरण करिता करिता नित्य पद प्राप्त होते. त्यास विशेष प्रयत्न करावा लागत नाही. पण ज्या दुर्भाग्यास अशुभ वासनासमूह अशुभ कमोन. प्रकृस करीत असतो, त्यास मोठ्या धैर्याने व प्रयत्नानें प्राक्तन कर्म जिकावे लागते. यास्तव रामा, तू असा कुक्कल्पना करीत बसू नकोस. तू सूज्ञ आहेस: केवला चैतन्य हेच तुझे सत्य-स्वरूप आहे; हा जड देह. तू नव्हेस; मग तू कोणाच्या अधीन असणार ? बाबारे, जड पदार्थ चेतनाच्या अधीन असतात. चेतन कोणाच्याही अधीन रहात नाही. पारतत्र्य हा धर्म ब्रह्मदेवाने जडान्या नशिबी लिहिला आहे. चेतनाच्या नाही पण तू जर असे ह्मणशील की, मी जरी चेतन आहे, तरी मला दसरे चेतन प्रेरणा करिते, तेव्हा मी त्याच्या अधीन आहे. तर ते . फार वळ टिकणार नाही. कारपा: चेतनालाही दुसरे चेतन आपल्या स्वाधीन ठेवते, असें, एकदा झटल्यावर त्याला स्वाधीन ठेवणारे तिसरें चेतन, त्याला स्वाधीच ठेलमारे चवथे, त्याला पाचवें, सहावें, सातवे, दहावे, .,शभरावें; सहस्रावे इत्यादि..प्रकारे.अनवस्था प्राप्त होते... ह्मणजे कोणत्या चेतनास मूल . समजाने त्याचा निर्णय , होत नाही. यास्तव, ते स्वतत्र आहे हा सिद्धात ध्यानात धर.. तुन स्वतत्र चेतनास प्रतिबंध करण्यास कोयी, समर्थ होणार, नाही. बा, सत्पुत्रा, - शुभ, व अशुभ या दोन मार्माजी .वासनारूपी नदी वाहत असते. विला दीर्घ प्रयत्नाने ..शुभ