पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपञ्चमप्रकरण-सर्ग २९. जात असे. त्याच्या उप्र प्रतापाच्या उष्णतेमुळे समुद्राचे जलही शुक होत असे. त्याच्या दृष्टिपातानेच कुलपर्वत चळ चळ का लागत. फळांच्या भाराने नम्र झालेल्या वेलींप्रमाणे सर्व दिशा त्याच्यापुढें नम होत असत. त्याच्या यज्ञाचे धूम मेघरूप होऊन जगद्रक्षक होत असत. त्या शूराने सर्व भुवनांस लीलेनेंच जिंकून घेऊन दीर्घ काल राज्य केलें. अनेक मोम भोगले. पण त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. विषय सुखाविषयीची त्याची इच्छा अधिकाधिकच वाढू लागली. तथापि विषयजन्य सुख फार वेळ टिकत नाही व भोग घेतांच त्याविषयी मन विरस होते, असे पाइन त्याच्या मनात त्यांविषयी उद्वेग उत्पन्न झाला व एकदा मेरूच्या उच्च शिखरावरील रत्नजडित राजमंदिराच्या खिडकीत बसून तो आपणच या ससारस्थितीविषयी असा विचार करूं लागला.- ज्याची शक्ति अकुंठित आहे अशा मीच आता या त्रिभुवनात साम्राज्य करावे व यथेच्छ विहार करावा अशी स्थिति प्राप्त झाली आहे. पण अनेक भोगांच्या योगाने अति मनोहर झालेल्या व अद्भुत भशा या माझ्या मोठ्या राष्ट्राचा मोग घेतल्याने तरी काय होणार ! सकदर्शनी रमणीय व अवश्य क्षय पावणारे, असे हे सर्व भोग जरी मी भोगले तरी मला सुख कितीसे होणार ! पुनः तोच दिवस, तीच रात्र, व तीच स्नान-भोजन-शयनादि कर्मे; खरोखर त्याच्या ठिकाणचे लांपव्य संतोषावह तर नाहीच, पण लज्जावह आहे. पुनः कातेला आलिंगन देउन पुनःतिचा उपभोग घेणे, ही लहान पोरांस शोभणारी क्रीडा आहे. मोठ्याना तिच्या योगाने लज्जाच वाटली पाहिजे. प्रतिदिवशी भोग घेऊन झाल्यावर शिरस वाटणारे तेच ते व्यापार पुनः पुनः करतांना सुज्ञ प्राणी लाजत कसा नाही! पुनः दिवस, पुनः रात्र व पुनः कार्यपरंपरा याप्रमाणे ही पुनः पुनः प्राज्ञाची विटंबनाच चालली आहे, असे मी जाणतो. बळ तरंगरूप होउन पुनः जसें तेंच तरंगरहित बनते त्याप्रमाणे हा जन सतत तीच ती किया करतो. लहान पोराच्या किंवा वेव्याच्या चेष्टेसारखी ही प्राण्यांची पुनः पुनः होणारी क्रिया शहाण्यास हसावयास लावते. ज्याचा प्राप्तीने कतहत्य होता येईल असा पदार्थ या जगात कोणता बाहे! अथवा है मोठे भारंबर (दृष्ट पपष्ट पळ देणारे कर्मचात) अम्ही बों किती दिवस करीत रहाणार ! व त्यापासून कोणता मम होणार!