पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहयोगवासिष्ठसार, अमृताने भरून गेलों माहे. स्वस्थ व शीतलारमा शालों भआहे. मला आंतल्या आंत अवर्णनीय मानंद होत आहे. परंतु भगवन, आपलें मधुर भाषण ऐकत असताना माझ्या मनाची तृप्ति होत नाही. गुरुराज, माझा बोध दृढ व्हावा म्हणून बलीची ज्ञानप्राप्ति मला सांगा. हात जोडून प्रार्थना करणाऱ्या शरणागताचा संत कधीच कंटाळा करीत नसतात, भीवसिष्ठ-राघवा, बरे आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे मी आतां तुला बलीचा उत्तम वृत्तांत सांगतो. अरे वेड्या, तुझ्यासारखे श्रोते तरी वक्त्यांना कोठे सांपडतात ! असो; या आख्यानाचे श्रवण एकाममनाने केल्यास तुजप्रमाणे इतरांचाही बोध दृढ होईल. __ या जगत्कोशा(ब्रह्माडा)च्या एका कोपऱ्यांत भूलोकाच्या खाली पाताळ म्हणून एक प्रसिद्ध लोक आहे. त्याच्या आतील भाग कचित् स्थळी क्षीर- सागरांत झालेल्या व ज्याच्या शरीरास अमृतकिरणांचा लेप लागला आहे अशा दानवकन्याच्या योगाने प्रकाशित होत असतो. कोठे व्याकरण- छंदःशास्त्रादिकाचे व्याख्यान चाललें असताना होणाऱ्या दोनपासून दोन सहस्रपर्यंत जिहानी युक्त असलेल्या नागांच्या शब्दांनी व दोन चंचल जिभांनी युक्त असलेल्या असंख्य नागांनी व्याप्त झालेला असतो. कों कोठे त्या लोकाचा प्रदेश चालते बोलते मेरुच अशा दानवानी परिपूर्ण असतो. कोठे दिग्गज असतात. कचित् असंख्य भयभीत प्राण्यांच्या भारोळ्या व दुर्गंधयुक्त नरक यानी तो भयंकर झालेला असतो. भूलोक. पर्यंत एकावर एक असे सात पाताळ लोक एकाद्या दोरीत ओंवलेल्या खोब- याच्या वाव्याप्रमाणे एकमेकाशी संबद्ध झाले आहेत. त्यांतील काही भाग मेरूच्या पादांनी व्याप्त होते. काही भागास भगवान् कपिलाने पवित्र केले होते व कोठे कोठे असरत्रियानी जमविलेल्या सामग्रीचा अभिलाप कर- णान्या मुवर्णलिंगमय शंकराकडून ते ( पाताळ ) पाळले जात होते. __ भसो; अशा प्रकारच्या त्या असुररक्षित पाताळात विरोचनपुत्र बाल राजा होता. देव, विद्याधर व उरग यांसह देवराजही त्याच्या पादसंवाहनाची (पाय चेपण्याची इच्छा करीत असे. तो राजा त्रैलोक्यातील रत्नांचा कोश, सर्व शरीरी जीवांचा रक्षक व इंद्र, मनु, शेष इत्यादि लोकधारकांचाहीमाधार असून स्वतः हरि त्याचा पालक होता. त्या दानवराजाचे नाव ऐकताच ऐरावताच्या गंडस्थळावरील मदजल सुकून